Karnataka Adiyogi Statue : हर हर महादेव! 'आदियोगी' शंकराची 112 फूट उंच मूर्ती, भव्य शिवमूर्तीचं लोकार्पण
कर्नाटकमध्ये (Karnataka) आदियोगी शिवशंकराच्या (Adiyogi Shiva Statue) 112 फूट उंच मूर्तीचे लोकार्पण करण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्नाटकातील नंदी टेकडीच्या पायथ्याशी आदियोगी शंकराच्या भव्य मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
रविवारी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हा कार्यक्रम पार पडला आहे. ही मूर्ती तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे स्थापन करण्यात आलेल्या आदियोगी शंकराच्या मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते या आदियोगी मूर्तीचं अनावरण करण्यात आलं आहे. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरु हेही उपस्थित होते.
कर्नाटकच्या चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील नंदी हिल्स येथे असलेल्या ईशा फाऊंडेशनच्या आश्रम परिसरात आदियोगी शिवशंकराची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे.
भारतीय कला, संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरांना चालना देण्यासाठी ईशा फाऊंडेशनकडून आश्रमाची स्थापना करण्यात आली आहे.
आदियोगी शंकराच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासह अनेक दिग्गजांची हजेरी होती.
तामिळनाडूमध्ये भगवान शंकराची आदियोगी मूर्ती आहे. 112 फूट उंच मूर्ती तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे 2017 साली स्थापन करण्यात आली.
तामिळनाडूतील याच आदियोगी मूर्तीची हुबेहुब प्रतिमा आता कर्नाटकात स्थापन करण्यात आली आहे.
भगवान शंकराला आदियोगी म्हणजे प्रथम योगी असं म्हटलं जातं. ही मूर्ती तयार करण्यासाठी दोन वर्षे आणि आठ महिने कालावधी लागला.
तामिळनाडूतील आदियोगी शिवमूर्ती जगभरातील पर्यटकांसाठी हे एक प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थान आहे.
कर्नाटकातील आदियोगी शंकराच्या भव्य मूर्तीमुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे.