Shimla Snowfall : हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी, शिमला शहरावर बर्फाची चादर; निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी
बर्फवृष्टीमुळे राजधानी शिमलामध्ये पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. (PC : ANI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदीर्घ प्रतिक्षेनंतर हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे बर्फवृष्टी झाली आहे. सध्या बर्फवृष्टी कमी असली तरी या बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. (PC : ANI)
शिमलामध्ये डोंगराळ भागात अधिक बर्फवृष्टी झाली आहे, तर शहरात सध्या बर्फवृष्टी कमी आहे. (PC : ANI)
स्थानिक लोकांसोबतच पर्यटकही बराच काळ बर्फवृष्टीची वाट पाहत होते. (PC : ANI)
बर्फवृष्टीमुळे पर्यटकांचीही पुन्हा एकदा राजधानी शिमलाकडे वळायला सुरुवात झाली आहे. (PC : ANI)
पश्चिमी वाऱ्यांमुळे 11 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान हिमवृष्टीचा अंदाज हवामान केंद्राने वर्तवला होता. (PC : ANI)
11-12 जानेवारी रोजी राजधानी शिमलामध्ये हवामान स्वच्छ होते. (PC : ANI)
मात्र अटल बोगदा, लाहौल स्पीती, चंबा आणि किन्नौरच्या उंच भागातच हिमवृष्टी झाली. (PC : ANI)
गुरुवारी सायंकाळपासून हिमवृष्टीला सुरुवात झाल्यानंतर सकाळपर्यंत शिमलातील रस्तेही पांढरे शुभ्र दिसत होते. (PC : ANI)
हिमवृष्टी पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनच नाही तर फलोत्पादनासाठीही महत्त्वाचे आहे. (PC : ANI)