Tulip Garden Festival Photo: जम्मू काश्मीरमधील ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुलं
काश्मीरमध्ये नवीन पर्यटन हंगाम सुरू होताच आशियातील सर्वात मोठं ट्यूलिप गार्डन लोकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. पूर्वेतील सिराज बाग म्हणून ओळखले जाणारे इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन 2008 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सुरु केलं होते. ट्यूलिप गार्डन जबरवन पर्वत रांगाच्या पायथ्याशी स्थित असून आशियातील सर्वात मोठं ट्यूलिप गार्डन आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appट्यूलिप गार्डन सुमारे 30 हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे. काश्मीर खोऱ्यात फुलांची शेती आणि पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने हे उद्यान उघडण्यात आले होते.
या बागेत यावर्षी विविध प्रकारची सुमारे 15 लाख फुलांची लागवड करण्यात आली आहे. आतापर्यंत बागेत सुमारे 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ट्यूलिप गार्डनमध्ये यंदा 62 प्रकारच्या ट्यूलिप्स आहेत. ट्यूलिपची फुले सरासरी तीन ते चार आठवडे टिकतात. परंतु मुसळधार पाऊस किंवा जास्त उष्णतेमुळे ते नष्ट होण्याची शक्यता जास्त असते. फ्लोरीकल्चर विभाग टप्प्याटप्प्याने ट्यूलिप्स लावतं जेणेकरून फुले बागेत महिनाभर किंवा त्याहून अधिक काळ टिकतील.
काश्मीर खोऱ्यात नवीन पर्यटन हंगाम सुरू झाल्याने पर्यटन विभागाने पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बागेत सांस्कृतिक कार्यक्रमाची योजना आखली आहे.
ट्यूलिप गार्डन उभारण्यामागील उद्देश म्हणजे पर्यटकांना आणखी एक पर्याय देणे. येथे दरवर्षी हजारो पर्यटक येतात.
लॉकडाऊनमुळे मागील वर्षी बंद असलेलं गार्डन दोन वर्षांनंतर खुलं करण्यात आल आहे.. अधिकाऱ्यांनी सांगितले की फ्लोरिकल्चर विभागाने मानक ऑपरेटिंग प्रक्रियेची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पुरेसे उपाय केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना ट्यूलिप गार्डनला भेट द्यावी असं आवाहन केले. मोदी यांनी म्हटलं की, जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा जम्मू-काश्मीरला जाऊन सुंदर ट्यूलिप गार्डनला भेट द्या.
25 मार्च जम्मू-काश्मीरसाठी खास दिवस आहे. जबरवन पर्वताच्या पायथ्याशी असलेले अद्भुत ट्यूलिप गार्डन पर्यटकांसाठी खुलं केलं जाईल. बागेत 64 पेक्षा जास्त प्रकारची 15 लाखांहून अधिक फुले दिसतील, असं मोदींनी म्हटलं.