लदाख आणि काश्मिरला जोडणारा जोजिला पास रस्ता अजूनही वाहतूकीसाठी खुला, BRO ची उल्लेखनीय कामगिरी
लदाख आणि काश्मीरला जोडणारा जोजिला पास हा रोड जानेवारी महिन्यातही वाहतूकीसाठी खुला आहे. (Photo:@DefencePRO_Guj Twitter)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबर्फवृष्टी होऊनही हा रस्ता वाहतूकीसाठी खुला ठेवण्यात सीमा रस्ता संघटन अर्थात Border Roads Organisation (BRO) ला यश आलं आहे. (Photo:@DefencePRO_Guj Twitter)
त्यामुळे BRO च्या कर्मचाऱ्यांच्या कामाबद्दल कौतुक केले जात आहे. (Photo:@DefencePRO_Guj Twitter)
नवीन वर्षाच्या पहिल्या तीन दिवसांत तब्बल 178 वाहने जोजिला रस्त्यावरुन पास झाल्या आहेत. (Photo:@aahil_riyaz Twitter)
मागील वर्षी 31 डिसेंबर 2020 रोजी बंद करण्यात आलेल्या हा रस्ता 28 फेब्रुवारी 2021 रोजी खोलण्यात BRO ला यश आलं होतं. (Photo:@aahil_riyaz Twitter)
बर्फाचे वादळ आणि हिमस्खलनाचा धोका असताना सीमा रस्ते संघटनेचे जवान आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने सतत बर्फ हटवत आहेत. (Photo:@aahil_riyaz Twitter)
बर्फाच्छादित असलेला हा जोजिला पास ओलांडणे अत्यंत अवघड काम असून सीमा रस्ते संघटनेच्या जवानांचे काम उल्लेखणीय आहे. (Photo:@aahil_riyaz Twitter)
या रस्त्यावरुन वाहतूक करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. (Photo:@BROindiaTwitter)
दरम्यान BRO चे कर्मचारी बर्फ हटवण्याचे काम करतात त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येत असतो. (Photo:@BROindiaTwitter)