Jammu Kashmir Snowfall : ये हसीं वादियां... जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी! सर्वत्र बर्फाची चादर, पर्यटकांची गर्दी
पर्यटकांचं आकर्षण असलेल्या जम्मू काश्मिरमध्येही बर्फाची चादर पाहायला मिळतं आहे. (PC : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजम्मू काश्मीरमधल्या मुघल रोडवरील पीर पंजाल रेंजमध्ये बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे सध्याचं तिथलं तापमान खाली घसरलं आहे. (PC : PTI)
जोरदार बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फच बर्फ पहायला मिळतेय. जम्मू-काश्मीरमधील लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. (PC : PTI)
पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे थंडीत वाढ झाली आहे. अजूनही बर्फवृष्टीचा अंदाज असल्याने थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. (PC : PTI)
पूंछ जिल्ह्याला काश्मीरशी जोडणारा ऐतिहासिक मुघल रोड ताज्या बर्फवृष्टीमुळे वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. (PC : PTI)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 6 डिसेंबरपर्यंत हवामानात चढ-उतार पाहायला मिळेल. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातही काही भागात पाऊस पडू शकतो. (PC : PTI)
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील भदेरवाह भागात शुक्रवारी जोरदार हिमवृष्टी झाली. (PC : PTI)
पर्यटनाचा हंगाम असल्याने जम्मू-काश्मीरमध्ये बर्फ हटवण्याचे कामही मोठ्या प्रमाणावर सुरू होणार आहे. (PC : PTI)
पर्यटकांनी पाऊले आता जम्मू आणि काश्मीरकडे वळू लागली आहेत. (PC : PTI)
मोठ्या संख्येने पर्यटक जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेशमध्ये दाखल होताना दिसत आहेत. (PC : PTI)
दरम्यान, उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील तंगधर रोडवर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने बर्फ हटवण्याचं काम सुरू केलं आहे. (PC : PTI)