Jaipur Fire : CNG अन् LPG टँकरची धडक होऊन भीषण स्फोट; 40 हून अधिक गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा होरपळून मृत्यू
जयपूरमधील पेट्रोल पंपाजवळ एलपीजी ट्रक आणि सीएनजी ट्रकची धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की हळूहळू 40 हून अधिक वाहने त्याचा फटका बसली. हा अपघात जयपूर-अजमेर महामार्गावर पहाटे 5 वाजेच्या सुमारास झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया अपघातात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा अपघातस्थळी पोहोचल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेतला.
जयपूर-अजमेर महामार्गावर केमिकलच्या टँकरमध्ये झालेल्या स्फोटामुळे अनेक जण दगावले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी केमिकलचा एक टँकर दुसऱ्या टँकरवर आदळला आणि आग लागली.
टँकरच्या भीषण स्फोटानंतर रस्त्यावर सुमारे 500 मीटरपर्यंत केमिकल पसरले. त्यामुळे अनेक वाहनांनी पेट घेतला. यामध्ये 40 हून अधिक वाहनांनी पेट घेतला. यामुळे एक कारखानाही जळाला. केमिकल आणि गॅसमुळे आग विझवण्यात टीमला खूप अडचणी येत आहेत.
भांक्रोटा पोलिस स्टेशनचे अधिकारी (SHO) मनीष गुप्ता यांनी सांगितलं की, आगीत अनेक ट्रक जळून खाक झाले आहेत. दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पोलिस आणि स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. दोन्ही ट्रकची टक्कर झाली तेव्हा मोठा स्फोट झाला आणि डोळ्यादेखत पाहता क्षणी ट्रॅक आगीचा गोळा बनला.
पोलिसांनी सांगितले की, या आगीत अनेक ट्रक जळून खाक झाले. काही लोक होरपळले आहेत, त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले आहे. ही घटना पेट्रोल पंपासमोर घडली.
या अपघातात होरपळलेल्या 24 हून अधिक जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. राजस्थानचे आरोग्य मंत्री गजेंद्र सिंह खिनवसार रुग्णालयात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतली. जखमींवर उपचार सुरू आहेत.
स्थानिकांनी सांगितलं की, एक टँकर वळण घेत असताना समोरून दुसरा टँकर आला आणि दोघांची जोरदार धडक झाली. यावेळी मोठा आवाज झाला आणि पाहता-पाहता आग पसरली.