फुलांपासून आयफेल टॉवर! फुलं, धान्यांपासून साकारल्या विविध प्रतिकृती
बेळगावमध्ये बागायत खात्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या फल पुष्प प्रदर्शनात फुले,धान्य यापासून साकारण्यात आलेल्या विविध प्रतिकृती लक्षवेधी ठरल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफुलांपासून तयार करण्यात आलेल्या आयफेल टॉवर तर प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरला आहे.
प्रदर्शनात अनेक प्रकारची फळे, फुले आणि सजावटीची रोपे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
विविधरंगी गुलाब, मोगरा, जाई,जुई, जास्वंदी ,केसर आंबा,शोभेची रोपे, अनेक प्रकारच्या भाज्या, फळे प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.
प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या दोन वर्षात फळ देणाऱ्या केसर आंब्यांच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.
बेळगावात 1924 साली काँग्रेसचे अधिवेशन झाले होते.त्या अधिवेशनाचे अध्यक्षपद महात्मा गांधींनी भूषवले होते. या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने महात्मा गांधीचा पुतळा देखील प्रदर्शनात साकारण्यात आला आहे.
याशिवाय गुलाबापासून साकारण्यात आलेले हृदय देखील प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांचा सेल्फी पॉइंट बनला आहे.
वाईट बोलू नका,वाईट ऐकू नका आणि वाईट पाहू नका असा संदेश देणारी तीन माकडांची प्रतिकृती प्रसिध्द आहे.त्यात आणखी एका माकडाची भर घालण्यात आली आहे.चौथे माकड हातात मोबाईल धरून बसले आहे.
याशिवाय विविध प्रकारची खते, बाग कामासाठी लागणारे साहित्य,बी बियाणे देखील प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.