Uttarakhand | कोई है... ? अहोरात्र मेहनत घेत तपोवन बोगद्यात ITBPच्या 'हिमवीरां'कडून शोधमोहिम
उत्तराखंडमध्ये निसर्गानं रविवारी पुन्हा एकदा आणखी एक रौद्र रुप दाखवलं. (सर्व छायाचित्रं- @ITBP_official/ ट्विटर)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनद्यांवर सुरु असणाऱ्या प्रकल्पांनाही याचा फटला बसला, संपूर्ण प्रकल्पच नव्हे तर त्यावर काम करणारे मजूरही पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले. (सर्व छायाचित्रं- @ITBP_official/ ट्विटर)
चमोली जिल्ह्यात एक भलामोठा हिमकडा कोसळ्यामुळं या भागात हाहाकार माजला आणि सदर परिसरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ झाली. (सर्व छायाचित्रं- @ITBP_official/ ट्विटर)
जिवीत हानीचा आकडा कमी करण्यााठी आणि तपोवन बोगद्यात अडकलेल्या मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आयटीबीपी आणि इतर यंत्रणांनी कंबर कसली आहे. (सर्व छायाचित्रं- @ITBP_official/ ट्विटर)
उत्तराखंड दुर्घटनेला तीन दिवस उलटल्यानंतरही हे बचावकार्य दिवसरात्र सुरुच आहे. (सर्व छायाचित्रं- @ITBP_official/ ट्विटर)
पुरसदृश्य परिस्थितीमुळं संपर्क तुटलेल्या गावांमध्ये जीवनावश्यक गोष्टी, शिधा पोहोचवण्यासाठी आयटीबीपीच्या या जवानांनी डोंगरही पालथे घातले आहेत. माणुसकीच्या या नात्याचं दर्शन सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेली छायाचित्र सांगून जात आहेत. (सर्व छायाचित्रं- @ITBP_official/ ट्विटर)
फक्त मजुरांचा बचावच करण्यापुरता सिमीत न राहता हे जवान नजीकच्या प्रभाविक गावांना मदतीचा हातही देत आहेत. (सर्व छायाचित्रं- @ITBP_official/ ट्विटर)
संकट कसंही आणि कोणतंही असो, त्यावर मात करुन कर्तबगारीची नवी उंची गाठणाऱ्या आणि कमालीचं साहस दाखवणाऱ्या या हिमवीरांना सध्या सारा देश सलाम करत आहे. (सर्व छायाचित्रं- @ITBP_official/ ट्विटर)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -