In Pics : शेतकऱ्यांचा आज देशभर चक्का जाम, दिल्लीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
कारण तिथं आधीपासून होत असलेल्या आंदोलनामुळं चक्का जाम सारखी परिस्थिती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीमध्ये चक्का जाम होणार नाही.
अत्यावश्यक सेवेतील आणि शाळेच्या बस व रुग्णवाहिकांना जाऊ देण्याचे निर्देश संयुक्त मोर्चाने आंदोलकांना दिले आहेत.
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितलं आहे की, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये चक्का जाम होणार नाही, मात्र या दोन्ही राज्यांमध्ये एक लाख शेतकरी स्टॅंडबायमध्ये असतील
दिल्लीतील 120 मेट्रो स्टेशनवर अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
पोलिस, पॅरामिल्ट्री आणि रिझर्व फोर्सचे जवळपास 50 हजार जवान दिल्ली एनसीआर क्षेत्रात तैनात करण्यात आले आहे.
यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्याबरोबरच रस्तेही बंद करण्यात आले आहेत.
'चक्का जाम’च्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून आधी घोषित केल्यानुसार आज 'चक्का जाम' करण्यात येणार आहे. आज दुपारी 12 ते 3 या वेळेत हे देशव्यापी आंदोलन केलं जाणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -