Aditya-L1 Mission : अशी सुरु झाली मिशन आदित्यची गोष्ट, शास्रज्ञांनी सांगितला संपूर्ण प्रवास
पण या मिशन आदित्यचा प्रवास कसा सुरु झाला हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयासंदर्भात बंगळूरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स (IIA) चे प्राध्यापक जगदेव सिंह यांनी माहिती दिली आहे.
सुरुवातील फक्त 800 किमीचा प्रवास करण्याचं निश्चित करण्यात आलं होतं, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी या संदर्भात भाष्य केलं आहे.
तसेच हे यान प्लाझ्माचा देखील अभ्यास करणार असल्याचं म्हटलं आहे.
16 फेब्रुवारी 1980 रोजी भारतात संपूर्ण सूर्यग्रहण झाले होते.
त्यावेळी आयआयएचे संस्थापक-संचालक एमके वेणू बाप्पू यांनी जगदेव सिंह यांना सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करण्यास प्रोत्साहित केले.
पंरतु ग्रहणकाळात फक्त 5-7 मिनिटचं सूर्याचा अभ्यास करता येत होता. सखोल अभ्यासासाठी हा कालावधी पुरेसा नव्हता.
त्यानंतर त्यांनी इस्रो आणि इतर संस्थांशी याबाबत चर्चा केली.
2009 मध्ये याविषयी चर्चा करण्यास सुरुवात झाली आणि 2012 मध्ये ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.