Chandrayaan 3 : उद्या अवकाशात झेपावणार चांद्रयान-3, 'या' दिवशी चंद्रावर उतरणार
चांद्रयान-3 प्रक्षेपणाची तयारी पूर्ण झाली आहे. या महिमेअंतर्गत पहिल्यांदाच अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. (PC:PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइस्रोचं चांद्रयान 3 अंतराळयान शुक्रवारी 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2.35 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात येणार आहे.(PC:PTI)
चांद्रयान-3 हा इस्रोच्या चंद्रमोहिमेतील तिसरा टप्पा आहे. याआधी चांद्रयान-1 आणि चांद्रयान-2 प्रक्षेपित करण्यात आलं होतं. चांद्रयान-2 द्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा चंद्राच्या चांद्रयान-3 द्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न असणार आहे.(PC:PTI)
चार वर्षांनंतर इस्रो पुन्हा एकदा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. चार वर्षांपूर्वा हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता.(PC:PTI)
चांद्रयान 3 हे चांद्रयान 2 चा पुढचा टप्पा आहे. सप्टेंबर 2019 मध्ये चांद्रयान 2 प्रक्षेपित करण्यात आलं होतं. पण, ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात अयशस्वी ठरलं. चांद्रयान 2 चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश झालं. त्यामुळे आता इस्रो चार वर्षानंतर पुन्हा एकदा चंद्र मोहिमेसाठी सज्ज झालं आहे. (PC:PTI)
चांद्रयान-3 चं एकूण वजन 3900 किलो आहे. या मोहिमेसाठी सुमारे 615 कोटी रुपये खर्च आला आहे. चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरचा वापर केल्याने चांद्रयान-3 चा खर्च तुलनेने कमी झाला आहे. चांद्रयान 2 मोहिमेसाठी 960 कोटी रुपये तर चांद्रयान-1 साठी 386 कोटी रुपये खर्च आला होता.(PC:PTI)
इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 अंतराळयान 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याची अपेक्षा आहे. . दरम्यान, परिस्थितीनुसार वेळ बदलू शकते. (PC:PTI)
चांद्रयान 3 चा मुख्य उद्देश चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून तेथील पृष्ठभागाचं रासायनिक विश्लेषण करणं आहे आहे. या भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान शोधण्यास मदत होईल.(PC:PTI)
चांद्रयान-3 लाँच व्हेइकल म्हणजेच रॉकेटसोबत जोडलं गेलं असून प्रेक्षपणाची तालीमही पूर्ण झाली आहे. चांद्रयान 3 प्रक्षेपणाची तयारी पू्र्ण झाली आहे.(PC:PTI)
उद्या भारतासाठी भारत महत्त्वाचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर इस्त्रो (ISRO) शास्त्रज्ञांची टीम चांद्रयान-3 चे लघु मॉडेल घेऊन तिरुपती मंदिरात प्रार्थना आणि दर्शन करण्यासाठी पोहोचली. (PC:PTI)