Himachal Flood: उत्तरेत चार दिवसांत पावसाचे 100 बळी,10 हजार पर्यटक अडकले, पावसामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान
सध्या सर्वत्र पावसाची धुव्वाधार बॅटिंग सुरु आहे (All Photo Credit - PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तरेत अतिवृष्टीमुळे अनेक भागांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालंय.
गेल्या चार दिवसांत या मुसळधार पावसात 100 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत.
तर दहा हजार पर्यटक या पावसात अडकले आहेत.
हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणासह विविध राज्यांमधील जनजीवन अक्षरशः उद्ध्वस्त झाले.
महामार्ग बंद झाले, भूस्खलन होऊन रस्ते, रेल्वे रूळ वाहून गेले, इमारती, घरे पत्त्यासारखी कोसळली.
उत्तराखंडमध्येही नद्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
उत्तराखंडमध्येही नद्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
तर तिकडे राजधानी दिल्लीत यमुनेचे पाणी घुसल्यामुळे नागरिकांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
तसेच गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून मदतीचे आवाहन देखील केले आहे.