India In Pics: दिल्लीत G20 परिषदेची तयारी, चंद्रानंतर भारत आता सूर्यावर; फोटोंमधून पाहा या आठवड्यातील घडामोडी
भारताच्या आदित्य L1 (Aditya L1) या सूर्य मोहिमेचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे. शनिवारी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी या यानाचं प्रक्षेपण करण्यात आलं. सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने भारताचं यान सूर्याच्या दिशेने झेपावलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 लोककल्याण मार्गावर रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी पंतप्रधानांनी निवासस्थानी आलेल्या मुलांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत खेळतानाही दिसले.त्यांनी चांद्रयान-3 आणि अंतराळातील भारताच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त केला आणि कविताही वाचल्या.
भाजपविरोधी पक्षांची आघाडी I.N.D.I.A. ची (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स) मुंबईतील दोन दिवसीय बैठक शुक्रवारी (1 सप्टेंबर 2023) संपली.
विरोधी पक्षांनी बोलावलेल्या I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीत 28 पक्षांचे प्रमुख नेते आणि त्यांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीच्या शेवटी ठाकरे गटाने स्पष्ट केलं की, विरोधी आघाडी मोदींचा पराभव करण्यासाठी समन्वयकाशिवाय काम करेल. आम्ही भाजपविरुद्ध एकहाती लढण्याचा निर्णय घेतला आहे.
आपचे नेते अरविंद केजरीवाल, काँग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित होते.
भाजपविरोधात मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्ष एकत्र आले आहेत.
दिल्ली पोलिसांनी 9 आणि 10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या G20 शिखर परिषदेसाठी चोख तयारी केली आहे. कोणत्याही प्रकारची घुसखोरी, दहशतवादी कारवाया किंवा तोडफोड रोखण्यासाठी विस्तृत सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) या व्यवस्थांमध्ये दिल्ली पोलिसांना मदत करणार आहेत.
दिल्ली पोलिसांच्या प्रशिक्षणार्थी कमांडोंनी शुक्रवारी सकाळी G20 शिखर परिषदेसाठी सुरक्षेसाठी हेलिकॉप्टर सराव केला.
आसाममधील पूरस्थिती गंभीर असून ब्रह्मपुत्रा नदीला अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्याने गुरुवारपर्यंत 4 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. पुरामुळे एकाचा मृत्यू झाला. 19 जिल्ह्यांतील एकूण 4,03,313 लोकांना पुराचा फटका बसला आहे.
माझगाव डॉक शिप बिल्डर्समध्ये (एमडीएल) बांधणी करण्यात आलेल्या ‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचं जलावतरण उपराष्ट्रपती जगद धनखड यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ग्रँडमास्टर प्रज्ञानानंदची भेट घेतली. यावेळी मोदी बुद्धिबळपटू प्रज्ञानानंदसोबत बुद्धिबळ खेळताना दिसले.