IRCTCचं साउथ इंडिया Tour पॅकेजमध्ये दक्षिण भारतात फिरण्याची मजा
आयआरसीटीसी नेहमी नवनवीन टूर पॅकेजेस लाँच करत असते आणि यामध्ये तुम्ही एकटे किंवा जोडीदार आणि कुटुंबासह जाऊनही खूप मजा करू शकता. (Image Source : istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही नवीन वर्षात फिरण्याचा विचार करत असाल तर, IRCTC चं जानेवारीमध्ये खास टूर पॅकेज सुरु होत आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला दक्षिण भारतात फिरण्याची मजा घेता येणार आहे. (Image Source : istock)
या पॅकेजमध्ये तुम्ही एकाच वेळी अनेक ठिकाणांना भेट देऊ शकाल आणि तेही बजेटमध्ये. या टूर पॅकेजची सुरुवात मुंबईपासून होणार आहे. जानेवारी व्यतिरिक्त मार्चमध्येही तुम्ही या पॅकेजचा लाभ घेऊ शकता. (Image Source : istock)
आयआरसीटीसीच्या या पॅकेजचं नाव साउथ इंडिया टूर (South India Tour) पॅकेज आहे. हे पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांचं असून हे फ्लाइट पॅकेज आहे. (Image Source : istock)
साउथ इंडिया टूर पॅकेजमध्ये तुम्हाला कन्याकुमारी, कोवलम, मदुराई, रामेश्वरम आणि त्रिवेंद्रम येथे फिरण्याची संधी मिळेल. (Image Source : istock)
या पॅकेजमध्ये तुम्हाला ये-जा करण्यासाठी दोन्ही बाजूंनी विमान सुविधा उपलब्ध असेल. राहण्यासाठी 3 स्टार हॉटेलची सुविधा उपलब्ध असेल. (Image Source : istock)
या टूर पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीचे जेवण उपलब्ध असेल. प्रवासासाठी एसी बसची सुविधा असेल. या टूर पॅकेजमध्ये प्रवास विमा देखील संरक्षित केला जाईल. (Image Source : istock)
या टूरमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 51,000 रुपये द्यावे लागतील. (Image Source : istock)
दोन जण प्रवास करणार असाल तर, प्रति व्यक्ती 39,600 रुपये मोजावे लागतील. (Image Source : istock)
तीन लोकांसाठी हे पॅकेज घेत असाल, तर प्रति व्यक्ती 38,000 रुपये फी भरावी लागेल. (Image Source : istock)
तुम्हाला मुलांसाठी वेगळी फी भरावी लागेल. (Image Source : istock)
5-11 वर्षाच्या मुलांच्या बेडसाठी तुम्हाला 33,600 रुपये द्यावे लागतील आणि तर याशिवाय तुम्हाला 29,300 रुपये द्यावे लागतील. (Image Source : istock)