North East Tour Package : ईशान्य भारत फिरण्याची इच्छा आहे? IRCTC चं खास पॅकेज; शिलाँग आणि चेरापुंजीसह अनेक ठिकाणं फिरण्याची संधी
भारताचा ईशान्य भाग नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुम्ही इथे भेट देण्याचा विचार करत असाल तर IRCTC च्या खास टूरची माहिती जाणून घ्या.
भारतातील ईशान्येकडील राज्य, तेथील संस्कृती आणि सौंदर्यासाठी फक्त भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत.
तुम्हालाही हिरवेगार पर्वत आणि नद्या अशा रमणीय वातावरणाता आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही IRCTC चं खास टूर पॅकेज बुक करू शकता.
या पॅकेजमध्ये तुम्हाला आसाममधील गुवाहाटी, मेघालयातील शिलाँग, चेरापुंजी, मावलिनॉन्ग यासारख्या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल.
आयआरसीटीसी नॉर्थ इस्ट टूर पॅकेज एक फ्लाइट पॅकेज आहे. हे चेन्नई, आंध्र प्रदेश येथून सुरू होईल.
तुम्ही 10 फेब्रुवारी 2024 पासून पॅकेजचा आनंद घेऊ शकता. हे संपूर्ण पॅकेज 7 दिवसांचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला ईशान्येतील अनेक प्रसिद्ध ठिकाणे पाहण्याची संधी मिळेल.
तुम्हाला या पॅकेजमध्ये तुम्हाला चांगल्या एसी हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच स्थानिक प्रवासासाठी पर्यटक बसची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
पॅकेजमध्ये तुम्हाला सिंगल बुकींगसाठी प्रति व्यक्ती 53,600 रुपये मोजावे लागतील. तर कपल किंवा दोन व्यक्तींच्या बुकींगसाठी 47,500 रुपये आणि तीन लोकांच्या बुकींगसाठी 44,500 रुपये भरावे लागतील.
यामध्ये तुम्हाला काझीरंगा नॅशनल पार्क जीप सफारीचा आनंद घेता येईल. या पॅकेजमध्ये तुम्हाला दिवस ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरची सुविधा देखील मिळेल.
IRCTC नॉर्थ इस्ट टूर पॅकेजबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि बुकिंगसाठी तुम्ही http://tinyurl.com/LTCFPNE या वेबसाईटला भेट देऊ शकता.