Vande Bharat Trains: पंतप्रधान मोदींनी लाँच केल्या 9 वंदे भारत ट्रेन; 'या' राज्यांना होणार फायदा
नव्याने लाँच झालेल्या वंदे भारत ट्रेन्समुळे अकरा राज्यांतील प्रवासाचा वेळ कमी होणार असून कनेक्टिव्हिटीही वाढणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सर्व वंदे भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवला. वंदे भारत गाड्या आधीच देशभरातील अनेक मार्गांवर धावत आहेत, यात आता आणखी नऊ रेल्वे गाड्यांची भर पडणार आहे.
या नऊ वंदे भारत एक्सप्रेस गाड्या 11 राज्यांमध्ये धावणार आहेत.
या राज्यांमध्ये राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरातचा समावेश आहे.
वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून या राज्यांमधील कनेक्टिव्हिटी सुधारेल. या कर्यक्रमावेळी पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित केलं.
या कार्यक्रमाला 11 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि इतर उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
नव्याने लाँच झालेल्या वंदे भारत ट्रेन्समध्ये महिला लोको पायलटचाही समावेश आहे.
देशातील कनेक्टिव्हिटी वाढवण्याची ही अभूतपूर्व संधी असल्याचं या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
दरम्यान, लाँच झालेल्या वंदे भारत ट्रेनसोबत विद्यार्थ्यांनी सेल्फीही घेतले.
शाळकरी मुलांना या नवीन तंत्रज्ञानाच्या ट्रेन्सबाबत वेगळंच नवल वाटतं.