In Pics : भारतातील सर्वात अलिशान ट्रेन्स; प्रवास भाडंही तितकच महाग
डेक्कन ओडिसीचा रॉयल ब्लू कलर ट्रेनमध्ये प्रवेश करताच तुम्हाला 'महाराजा' असल्यासारखं फील करुन देतो. या ट्रेनमध्ये अतिशय सुंदर इंटिरियर, डिलक्स केबिन आणि रेस्टॉरंटसह सर्व सुविधा आहेत. ही ट्रेन दिल्ली व मुंबई येथून धावते. याचं मॅनेजमेंट ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सकडून केलं जातं. रिपोर्टनुसार, या ट्रेनच्या डिलक्स केबिनचे भाडे 7.79. लाख रुपये (दोन लोकांसाठी) आणि प्रेसिडेंशियल सुएटसाठी 11.7 लाख रुपये (दोन लोकांसाठी) भाडे आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुद्ध एक्स्प्रेस मध्य प्रदेश आणि बिहारमधील सुंदर पर्यटन स्थळांचा आढावा घेते. यात बोध गया, राजगीर आणि नालंदासारख्या ठिकाणांचा समावेश आहे. या ट्रेनमध्ये लहान लायब्ररी, रेस्टॉरंटसह अनेक सुविधा आहेत. या गाडीचे भाडे एका रात्रीसाठी 12 हजार रुपये आणि 7 रात्रीसाठी 86 हजार रुपये आहे.
पॅलेस ऑन व्हील्स ही राजस्थान टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे चालवली जाणारी प्रथम हेरिटेज लक्झरी ट्रेन आहे. जी आता भारतीय आणि परदेशी पर्यटकांना शाही प्रवास देते. या ट्रेनमध्ये 7 रात्री डिलक्स केबिनचे भाडे 5.23 लाख रुपये आहे. त्याचबरोबर सुपर डिलक्स केबिनचे 7 रात्रीचे भाडे 9.42 लाख रुपये आहे.
कर्नाटक राज्य पर्यटन मंडळाच्या पुढाकाराने गोल्डन चॅरियट कित्येक जागतिक वारसा स्थळांवर प्रवास करते. 11 गेस्ट केबिनपैकी प्रत्येक केबिनचे नाव राजवंशाच्या नावावर आहे. तसेच या ट्रेनची सजावट म्हैसूर स्टाईलच्या अतिशय सुंदर फर्निचरप्रमाणे केली गेली आहे. ट्रेनमध्ये आयुर्वेद स्पा सेंटरदेखील आहे. या रेल्वेचे भाडे 6 रात्री आणि 7 दिवसांसाठी 5.8 लाख रुपये आणि 3 रात्री 4 दिवसांसाठी 3.3 लाख रुपये आहे.
महाराजा एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रवास करण्याचा अनुभव अगदी शानदार असतो. यामागील मुख्य कारण म्हणजे त्याची वर्ल्ड क्लास लक्झरी आणि सौंदर्य. राजवाड्यांसारख्या सुविधा आणि सौंदर्य असणार्या ट्रेनमध्ये बसून पर्यटक भारताचा वारसा पाहता यावा या विचाराने ही रेल्वे तयार केली गेली आहे. या ट्रेनच्या प्रेसिडेंशियल सुटमध्ये एक खाजगी लाऊंज, बेडरूम, लक्झरी वॉशरूम आणि डायनिंग एरिया आहे. या ट्रेनमध्ये 6 रात्री आणि 7 दिवसांसाठी डिलक्स केबिनचे तिकिट 8.9 लाख रुपये (दोन लोकांसाठी) आहे, तर प्रेसिडेंशियल सुटचे भाडे 37.9 लाख रुपये आहे.