In Pics : डीआरडीओकडून 'अग्नी पी' बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jun 2021 07:10 PM (IST)
1
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) नव्या पिढीतील अण्वस्त्रवाहू अग्नी पी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची आज (28 जून 2021) सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी ओदिशा किनारपट्टीवरील बालासोर इथे एपीजे अब्दुल कलाम बेटावर यशस्वी चाचणी घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
क्षेपणास्त्रावर लक्ष ठेवण्यासाठी, त्याचा माग घेण्यासाठी पूर्व किनारपट्टीवर विविध प्रकारची स्वयंचलित दूरप्रक्षेपण तसेच रडार यंत्रणा कार्यान्वीत आहेत.
3
उच्च दर्जाची अचूकता साधण्यासाठी हे क्षेपणास्त्र भूमितीविषयक सर्व निकषांचे तंतोतंत पालन करते.
4
अग्नी पी हे अग्नी श्रेणीतील नव्या पिढीचे प्रगत क्षेपणास्त्र आहे.
5
हे एक कॅनिस्टिराइज्ड क्षेपणास्त्र असून 1000 ते 2000 किमी पर्यंत मारा करण्याची याची क्षमता आहे.