सर्वात जास्त थंडी आणि सर्वात जास्त उष्णता एकाच शहरात
भारत (India) असा देश आहे की, जिथे तुम्ही एकाच वेळी विविध प्रकारच्या हवामानाचा आनंद घेऊ शकता. म्हणजे उन्हाळ्यात थंडीचा आनंद घ्यायचा असेल तर लडाख किंवा काश्मीरला जा. जर तुम्हाला हिवा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्हाला हिवाळ्यात उबदार वाटायचे असेल तर गोवा किंवा दक्षिण भारतातील कोणत्याही किनारी भागात जा.
भारतात अशी काही ठिकाणं आहेत जिथं हिवाळ्यात कडाक्याची थंडी असते आणि उन्हाळ्यात तीव्र उष्णता असते.
राजस्थान (Rajasthan) हे उष्ण राज्य म्हणून ओळखले जाते. परंतू, असे अनेक भाग आहेत जिथे हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडते.
चुरुमध्ये एवढी थंडी असते की, रात्री तापमान उणेपर्यंत पोहोचते.
हिवाळ्याबरोबरच चुरुला कडक उन्हाचा अनुभव देखील येतो. उन्हाळ्यात हे शहर भट्टी बनते.
उन्हाळ्यात चुरुमधील तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते.
जून 2021 मध्ये तिथे कमाल तापमान 51 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.