India This Week : या आठवड्यातील महत्वाच्या बातम्या, पाहा फोटो
शुक्रवारी रात्री मध्यरात्री समृद्धी महामार्गावरील पिंपळखुंटा या गावाजवळ प्रवासी बसचा भीषण अपघात. हा अपघात इतका भीषण होता की, बसमधील 33 प्रवाशांपैकी 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. यासोबत राज्य शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमी प्रवासांना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोमवारी, 26 जून रोजी ओडिशाच्या गंजम भागात एका भीषण अपघातामुळे 12 लोकांचा मृत्यू झाला, तर जखमींचा नेमका आकडा समजू शकला नाही.
झारखंडची राजधानी रांची येथे गुरूवारी, 29 जून रोजी एक मोठी घटना घडली. यामुळे 9 लग्जरी प्रवासी बसेस आगीमुळे जागीच जळून खाक झाली.
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी गुरुवारी, 29 जून रोजी मणिपूरच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी मणिपूरच्या लोकांशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी, 28 जून रोजी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.
तेलंगणा राज्यात सोमवारी, 26 जून रोजी भारत राष्ट्र समितीचे माजी खा. पोंगुलेती श्रीनिवास रेड्डी आणि तेलंगणाचे माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव यांच्यासह 30 पेक्षा जास्त बीआरएसच्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रानं लॉसने डायमंड लीगमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. त्यानं 87.66 मीटर अंतरावर भालाफेक करून हे स्थान पटकावलं आहे. या मोसमातील त्याचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी नीरजनं दोहा डायमंड लीगमध्ये 88.67 मीटर भाला फेकून पहिला क्रमांक पटकावला होता. यामुळे नीरज जागतिक क्रमावरीत पहिल्या क्रमांकाचा भालाफेकपटू बनला आहे.
गुजरातच्या सूरतमध्ये गुरुवारी, 29 जून रोजी पावसामुळे परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचलं होतं. यामुळे सूरतच्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे.
अमेरिकेचा दौरा संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्तमध्ये ग्रँड मुफ्ती डॉ.शौकी इब्राहिम अब्देल करिम अल्लाम यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान दोन्ही देशातील संबंध दृढ होण्यासाठी चर्चा करण्यात आली. या भेटीनंतर मोदींनी कैरोमधील ऐतिहासिक हकीम मशिदी आणि हेलियोपोलिस कब्रस्तानानाला भेट दिली. यावेळी मोदींनी बोहरी मुस्लीम समजाशी संवाद साधला आहे. मोदींचा हा दौरा खूप महत्त्वाचा मानला जात आहे.
गुरूवारी, 29 जून रोजी देशभरात जिल्हीज महिन्याचा चंद्र दिसल्यानंतर बकरी ईदचा सण साजरा करण्यात आला. बकरी ईदला ईद-उल-अजहा असंही म्हटलं जातं. यावेळी मुस्लीम बांधव नमाज अदा करताना दिसत आहेत.
दिल्ली युनिव्हर्सिटीच्या (DU) शताब्दी सोहळ्याला सहभागी होण्यासाठी शुक्रवारी, 30 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली मेट्रोने प्रवास केला. यावेळी दिल्ली मेट्रोतील सर्वसामान्य नागरिक पंतप्रधानांशी चर्चा करताना दिसत आहेत.