Goa Chikhal Kalo Festival 2023 : गोव्यात चिखल काला उत्सव साजरा, विठुरायाच्या गजरात दंग होऊन गोवेकर उघड्या अंगाने चिखलात लोळले!
जून महिन्यात जगभरातील विठ्ठल भक्तांना विठ्ठल-रूक्माई भेटीचे वेध लागलेले असतात
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआषाढी एकादशीचा सोहळा पार पडल्यानंतर गोव्यात चिखल काला उत्सव साजरा केला जातो
चिखल काला म्हणजे कपडे काढून उघड्या अंगाने चिखलात अक्षरश: लोळणे. यावेळी अनेक मनोरंजन करणारे अनेक खेळ खेळले जातात.
उत्तर गोव्यातील माशेल येथिल देवकी कृष्ण मंदीरात या चिखल काल्याचे आयोजन करण्यात आले होते.
एकमेकांच्या अंगावर चिखल उडवत विठुरायाच्या गजरात दंग होऊन चिखल काला आज खेळला जातो.
रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी असा जयघोष करत सर्व वयोगटातील पुरुष हा चिखलकाला खेळतात.
गोव्याचे असे अनेक सण आहेत जे फक्त गोव्यातच साजरे केले जातात.
चिखल काला हा असाच एक सण आहे. हा सण आषाढ महिन्याच्या 12 व्या दिवशी साजरा केला जातो. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार ते जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात येते. ऋतूनुसार, तो पावसाळ्याच्या मध्यभागी येतो, जो गोव्याचा मुख्य हंगाम आहे.
पावसाळ्यातील हा अतिशय उत्साही सण आहे. या उत्सवाची परंपरा 400 वर्षे जुनी असल्याचं म्हटलं जातं. यामध्ये लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वच पुरुष हे उघड्या अंगाने चिखलात लोळत विविध खेळ खेळत असतात. यावेळी जय हरी विठ्ठलचा गजर केला जातो.