Photo : राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेला सोनिया गांधींची साथ; पाहा क्षणचित्रे
काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'चा आज 29वा दिवस. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी कर्नाटकच्या मंड्या येथून राहुल गांधीसह यात्रेमध्ये सहभागी झाल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन एकप्रकारे मिशन 2024 ची सुरुवात केली आहे. आज शेकडो कार्यकर्ते आणि समर्थकांसह त्या कर्नाटकातील मंड्यामध्ये राहुल गांधींसोबत पदयात्रेत सहभागी झाल्या.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला 7 ऑक्टोबर रोजी एक महिना पूर्ण होणार आहे. या यात्रेत कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळणार आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये राहुल गांधी-सोनिया गांधी यांच्यासोबत समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
आज भारत जोडो यात्रेमधील एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये राहुल गांधी सोनिया गांधींच्या बुटांच्या लेस बांधताना दिसत आहेत. हा फोटो काँग्रेसनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट केला आहे.
सोनिया गांधी बऱ्याच दिवसांनंतर एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. प्रकृती अस्वास्थामुळे गेल्या काही दिवसांपासून त्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होत्या.
नवमी आणि दसऱ्यामुळे मंगळवारी (4 ऑक्टोबर) आणि (5 ऑक्टोबर) काँग्रेसची भारत जोडो यात्रेला काही काळासाठी ब्रेक लागला होता. कर्नाटकात या प्रवासाला ब्रेक लावण्यात आला. राहुल गांधी आणि इतर अनेक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून 'भारत जोडो यात्रा' सुरू केली होती.
भारत जोडो यात्रेदरम्यान आणि पक्षाच्या नवीन अध्यक्षाची निवड होण्यापूर्वी सोनिया गांधी कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. 5 ऑक्टोबर रोजी त्यांनी बेगूर गावातील प्रसिद्ध भीमन्नाकोल्ली मंदिरात देशभरात दसऱ्याच्या निमित्तानं प्रार्थना केली. काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे हेही आज पदयात्रेत दिसणार आहेत.
भारत जोडो यात्रेचा समारोप पुढच्या वर्षी काश्मीरमध्ये होणार आहे. या प्रवासात एकूण 3570 किमी अंतर कापलं जाणार आहे.
काँग्रेस पक्षाला पूर्वीपेक्षा मजबूत करण्यासोबतच महागाई आणि बेरोजगारीविरोधात आवाज उठवण्यासाठी ही यात्रा सुरू करण्यात आली आहे. (सौजन्य : आ. डॉ. अंजली निंबाळकर)