Snowfall 2023 : चोहीकडे बर्फच बर्फ, केदारनाथपासून कश्मीरपर्यंत बर्फानं झाकलीत शहरं; फोटोंमध्ये पाहा बर्फवृष्टीचं सौंदर्य
India snowfall 2023: अनेक ठिकाणी डोंगराळ भागात जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. बर्फाच्या शुभ्र चादरीनं झाकलेले रस्ते, झाडे, घरं खूप सुंदर दिसतायत. अनेक ठिकाणी बर्फवृष्टीमुळं जनजीवन ठप्प झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबर्फवृष्टीनंतर गंगोत्री धाम पांढरी चादर पांघरल्याप्रमाणे दिसतंय. गंगोत्री धामच्या सखल भागात कडाक्याची थंडी पडली आहे. बर्फवृष्टी आणि थंडीमुळे पारा उणे 3 अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे. (फोटो: ANI)
काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाल्यानंतर श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. रस्त्यावर बर्फ साचला आहे. महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. (फोटो: PTI)
सोनमर्ग, गुलमर्ग, पहलगाम आणि काश्मीरमधील इतर उंच भागात बर्फवृष्टी सुरू आहे. शुक्रवारी अनेक ठिकाणी हलकी बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर त्यानंतर 18 जानेवारीपर्यंत हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील. (फोटो: PTI)
काश्मीर सध्या 'चिल्लई कलान'च्या विळख्यात आहे. हा 40 दिवसांचा सर्वात कठोर हवामानाचा कालावधी आहे, जेव्हा हिमवर्षाव होण्याची शक्यता जास्तीत जास्त आणि सर्वाधिक असते. चिल्लई कलान 21 डिसेंबरला सुरू होते आणि 30 जानेवारीला संपते. त्यानंतरही थंडीची लाट कायम राहते, त्यानंतर 'चिल्लई खुर्द' (लहान थंडी) 20 दिवस टिकते आणि 'चिल्लई बचा' (बाळांची थंडी) 10 दिवस टिकते. (फोटो: PTI)
शहरात बुधवारी रात्री उणे 0.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली, जी आदल्या रात्रीच्या 3.5 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होती. (फोटो: PTI)
हिमाचल प्रदेशातील लाहौल आणि स्पिती खोऱ्यात गुरुवारी जोरदार बर्फवृष्टी झाली. कुल्लू पोलिसांनी एक आदेश जारी करून पर्यटकांना बर्फाळ भागात न जाण्यास सांगितलं आहे. सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलीस आता पर्यटकांना मनालीला परतण्यास सांगत आहेत. (फोटो: PTI)
केदारनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. 2 फुटांपर्यंत बर्फ साचल्याचं पाहायला मिळतंय. (फोटो: Twitter/@mrai650)