Photo : उत्तर भारतात थंडीची लाट येण्याची शक्यता
उत्तर भारतात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं याबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. मात्र, आणखी थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
14 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान उत्तर भारतात तापमानाचा पारा 5 अंशांपर्यंत खाली येण्याचा शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्सचा जोर कायम आहे. त्यामुळं पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या लगतच्या भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
आज जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
सध्या राजधानी दिल्लीचे तापमान सकाळी 12.2 अंश सेल्सिअस आहे. थोडासा तापमानाचा पारा कमी झाला आहे. मात्र, पुन्हा तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तासांत वायव्य भारत आणि लगतच्या मध्य भारताच्या काही भागात तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे.
15 ते 18 तारखेला उत्तर राजस्थानच्या काही भागांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडच्या वेगळ्या भागांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
कर्नाटकात 13 आणि 14 जानेवारीला, तर मध्य प्रदेशात 16 आणि 17 जानेवारीला थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर भरातात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. 14 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान तापमानाचा पारा 5 अंशांपर्यंत खाली येण्याचा शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.