world cartoonist day : भारतातील टॉप 10 व्यंगचित्रकार!
के. शंकर पिल्लई (k shankar pillai): के शंकर पिल्लई यांना भारतीय व्यंगचित्रकारांचे जनक म्हटले जाते. के शंकर पिल्लई हे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आवडत्या चित्रकारांपैकी एक होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआर. के. लक्ष्मण (r k laxman) व्यंगचित्र म्हटलं की, पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे आर. के. लक्ष्मण. रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण हे त्यांचे संपूर्ण नाव. व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांनी रेखाटलेला ‘कॉमन मॅन’ घराघरांत पोहोचला.
बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray ) : शिवसेना पक्षाचे संस्थापक आणि भारताच्या राजकारणातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे. कुशल राजकारणी असणारे बाळासाहेब उत्तम व्यंगचित्रकारही होते. बाळासाहेबांनी रेखाटलेली व्यंगचित्रे आजही लोकप्रिय आहेत
बी. वी. राममूर्ती (b v ramamurthy): दक्षिण भारतातील पॉकेट कार्टूनिस्ट म्हणून त्याना ओळखले जाते!
मारिओ मिरांडा (mario miranda ) : गोवा म्हटलं की, डोळ्यांसमोर येते ते नारळाच्या झाडाखाली गिटार घेऊन आनंदाने गाणे गात असलेल्या गोवन व्यक्तीचे कार्टून स्वरूपातील चित्र. हे चित्र रेखाटले होते व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांनी. त्यांनी आपल्या व्यंगचित्रातून गोवन जीवनशैली रेखाटली.
सुधीर तैलंग (sudhir tailang) : व्यंगचित्रकार सुधीर तैलंग यांनी आपल्या व्यंगचित्रांमधून नेहमीच सामान्य माणसाच्या व्यथा मांडल्या.
वि टी थॉमस (t v thomas) : केरळमध्ये लहान थोरांच्या मनावर थॉमस यांनी राज्य केलं
एन के रंगनाथन (n k ranganath) : जगभरातील नामवंत व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या असलेल्या चित्रांचा विक्रम त्यांच्या नावावर आहे
माया कामथ (maya kamath) : पुरुष व्यंगचित्रकाराच्या वर्चस्वा मध्ये माया यांचं सुद्धा नाव घेतलं जातं
हरीश चंद्र शुक्ला (harish chandra shukla) : शुक्ला यांनी हिंदी वृत्तपत्रातून आपली व्यंगचित्रे लोकांपर्यंत पोहोचवली