Wrestler Rahul Gandhi: राहुल गांधी कुस्तीच्या आखाड्यात, हरियाणात बजरंग पुनियासोबत रंगला डाव
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सकाळी अचानक हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील एका कुस्ती आखाड्याला भेट दिली आणि बजरंग पुनियासह कुस्तीपटूंच्या गटाची भेट घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय कुस्ती महासंघ (WFI) बाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची कुस्तीपटूंसोबत बैठकही झाली. त्यानंतर राहुल गांधी आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्यात कुस्तीचा डाव रंगल्याचंही पाहायला मिळालं.
काँग्रेसच्या हरियाणा युनिटच्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी सकाळीच छारा गावातील 'वीरेंद्र आखाडा' येथे पोहोचले आणि नंतर त्यांनी पुनिया आणि इतर कुस्तीपटूंशी चर्चा केली. राहुल गांधींनी बराच वेळी कुस्तीच्या आखाड्यात घालवला.
राहुल गांधींच्या आखाड्यातील भेटीबाबत बोलताना कुस्तीपटू म्हणाले की, राहुल गांधी सकाळी 6.15 वाजता आखाड्यात पोहोचले. त्यांनी आम्हाला आमच्या दैनंदिन दिनचर्येबद्दल विचारलं, आम्ही कसे व्यायाम करतो, तेसुद्धा पाहिलं आणि त्यांनी आमच्यासोबत व्यायामही केला.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, आम्हाला आनंद आहे की, त्यांना कुस्तीबद्दल भरपूर ज्ञान आहे. ते म्हणाले की, राहुल गांधींनी दूध, बाजरीची भाकरी आणि भाजी खाल्ली. राहुल गांधींना गावात पिकवलेल्या भाज्याही दिल्या, ज्या ते सोबत घेऊन गेले.
दरम्यान, दोन वेळा जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट हिनं मंगळवारी आपला खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार पंतप्रधानांना परत करण्याचा निर्णय घेतला.
यासंदर्भात विनेश फोगाटनं पंतप्रधानांना एक पत्रही लिहिलं आहे. कारण कुस्तीपटू न्यायासाठी लढा देत असताना, असे सन्मान निरर्थक झाले आहेत, असं विनेश फोगाटनं म्हटलं आहे.