Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ram Mandir Exclusive Photo : राम मंदिराचे मुख्य मंडप आणि गर्भगृहातले फोटो 'एबीपी माझा'वर, पाहा मंदिराच्या आतील पहिली झलक
अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. येत्या 22 जानेवारी रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया मंदिराच्या आतील काही फोटो एबीपी माझाच्या हाती लागले आहे. मंदिराचे मुख्य मंडप आणि गर्भगृहाचे हे पहिलेच दृश्य आहे.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहेत. 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला देशभरातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.
श्रीरामललाच्या अभिषेक सोहळ्याला सुरुवात करणारे वैदिक विधी मुख्य सोहळ्याच्या एक आठवडा आधी 16 जानेवारीला सुरू होतील.
यासाठी रामजन्मभूमी मंदिरात होणाऱ्या अभिषेक सोहळ्यासाठी सर्व परंपरेतील मान्यवर संत आणि राष्ट्राच्या सन्मानासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना निमंत्रण मिळाले आहे.
सहा ट्यूबवेल, एक स्वयंपाकघर आणि दहा खाटांचे रुग्णालय अशा अत्यावश्यक सुविधांनी युक्त तंबू येथे उभारण्यात आला.
श्री रामलल्ला अयोध्येत प्रकट झाले अशी जुनी श्रद्धा आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात असलेल्या मंडपात श्री रामलल्लाच्या मूर्तीची पूजा ही 1947 पासून सुरुच आहे. 1947 मध्ये जेव्हा रामलल्ला प्रकट झाल्याची बातमी जेव्हा पहिल्यांदा समोर आली. तेव्हापासून आजतागायत या ठिकाणी रामलल्लाची दैनंदिन पूजा ही कोणताही खंड न पडता सुरूच आहे.
श्री रामाच्या दर्शनासाठी आता जे भाविक येणार आहेत ते किमान 25 ते 30 फूटावरुन दर्शन घेणार आहेत. त्यामुळे इतक्या लांबून दर्शन व्यवस्थित घेता यावे यासाठी दुसऱ्या मोठ्या मूर्तीची आवश्यकता आहे हे लक्षात आल्याने दुसरी मुर्ती तयार केली जात आहे.
श्री रामाची नवीन मूर्ती ही उभी असलेली आहे. जी प्राचीन मूर्ती आहे ती देखील गर्भगृहातच ठेवली जाणार आहे. नवीन मूर्ती ही मोठी असेल. त्याच्यासमोर प्राचीन मूर्ती ठेवली जाईल.
नवीन मूर्ती ही अचल मूर्ती असेल. ती कायम गर्भगृहातच राहिल. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. दुसरी मूर्ती मात्र उत्सवमूर्ती असेल. जर कोणत्या उत्सवासाठी मूर्तीची मिरवणूक काढण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला तर या उत्सवमूर्तीची मिरवणूक काढण्यात येईल. अशा पद्धतीने दोन्ही मूर्ती गर्भगृहातच राहतील.