Odisha Train Accident: कुठे आक्रोश, तर कुणी घेतंय आपल्या माणसांचा शोध... अंगावर शहारे आणणारे ओडिशा अपघाताचे फोटो
Coromandel Express Derail: बालासोर येथे संध्याकाळी 6.51 च्या सुमारास रेल्वे अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रेनचे डब्बे उडून बाजूला पडले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया अपघातात अजुनही अनेक प्रवासी रेल्वेच्या डब्यात अडकल्याची माहिती समोर येत आहे. सध्या या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. याशिवाय 32 जणांची एनडीआरएफ टीम बचावाकार्यासाठी घटनास्थळी पाठवण्यात आली आहे.
ओडिशातील बालासोरमध्ये 2 जून रोजी बाहानागा रेल्वे स्थानकाजवळ एक भीषण अपघात झाला. अपघातात आतापर्यंत 233 जणांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात तीन ट्रेन म्हणजेच, मालगाडी, कोरोमंडल एक्सप्रेस आणि हावडा एक्सप्रेस एकमेकांना धडकल्यानं झाला.
ओडिशातील बालासोर येथे झालेल्या अपघातानंतर रेल्वेकडून मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच गंभीर जखमींना 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय पंतप्रधान मदत निधीतूनही मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.
रेल्वे अपघातातील अनेक जखमींना गोपाळपूर, खंटापाडा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. अपघातामुळे बालासोर ते भुवनेश्वरपर्यंतची रुग्णालयं जखमींनी भरलेली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, नवीन पटनायक यांच्यासह अनेक नेत्यांनी रेल्वे अपघातावर शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, नवीन पटनायक यांच्यासह अनेक नेत्यांनी रेल्वे अपघातावर शोक व्यक्त केला आहे.
बालासोर ट्रेनमध्ये शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात सर्वप्रथम, बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले आणि दुसऱ्या ट्रॅकवर वेगानं जाणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेसला धडकले. कोरोमंडल एक्सप्रेस पलीकडून येणाऱ्या मालगाडीला धडकली.