Odisha Train Accident: कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; पाहा भीषण रेल्वे अपघाताचे फोटो
ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहानागा रेल्वे स्थानकाजवळ भीषण रेल्वे अपघात झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोमंडल एक्स्प्रेसने मालगाडीला धडक दिल्याने हा अपघात झाला. समोरासमोर धडक झाल्याने एक्स्प्रेसचे चार डब्बे रुळावरून घसरले.
हा अपघात सायंकाळी 7 वाजून 20 मिनिटाच्या सुमारास घडला.
या अपघातात 100 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाकडून तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांसह रेल्वेचे अधिकारीदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
ओडिशा सरकारने डिजास्टर रॅपिड अॅक्शन दलाला मदत आणि बचाव कार्य सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाचवेळी एकाच रुळावर आल्याने हा अपघात झाला.
कोरोमंडल एक्सप्रेस ही चेन्नई ते पश्चिम बंगालमधील हावडा मार्गे ओडिशापर्यंत धावते.