Asia Cleanest Village Photos: 'हे' आहे आशियातील सर्वात स्वच्छ गाव! स्वच्छता न केल्यास खायला अन्नही नाही
देशातील वाढत्या काळानुसार पर्यावरणात प्रदूषणाची समस्याही वाढत आहे. जगभरातील देश या समस्येशी झुंजत आहेत. भारतातील मेघालयमध्ये एक गाव आहे, ज्याचे सौंदर्य जगभरातील लोकांना आकर्षित करते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहे गाव मेघालयची राजधानी शिलाँगपासून 90 किमी अंतरावर भारत-बांगलादेश सीमेजवळ आहे. या गावाचे नाव आहे - मल्लिनॉन्ग. लोक याला मिनी स्वित्झर्लंड असेही म्हणतात. खरे तर आशियातील सर्वात स्वच्छ गावाचा दर्जा मल्लिनॉन्गला आहे.
2003 मध्ये डिस्कव्हर इंडिया मासिकाने आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून मलिनॉन्गची ओळख करुन दिली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की येथे सर्व काही आधीपासून इतके चांगले नव्हते.
15 वर्षांपूर्वी 1988 मध्ये मल्लिनॉन्ग गावात साथीचा रोग पसरला होता. प्रत्येक ऋतूत येथे रोगराई पसरत असे, बहुतेक मुलं या आजाराने त्रस्त होती. गोष्टी खूप वाईट वळणावर गेल्या. आजारपणामुळे अनेक शाळकरी मुलांनाही जीव गमवावा लागला.
शेवटी शाळेतील एका शिक्षिकेने या सगळ्याला कंटाळून रोगाशी लढण्याचे व्रत घेतले. त्यांनी गावातील लोकांना स्वच्छता आणि शिक्षणाची जाणीव करून देण्यास सुरुवात केली. मोहीम राबवण्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली होती.
समितीने काही कडक नियम केले. जसे- गावकऱ्यांकडे जाऊन जनावरं बांधून ठेवली, रस्त्यावर कचरा टाकू नये, असे आवाहन केले. घरी शौचालये बांधण्याची प्रेरणा दिली.
याशिवाय प्लास्टिक वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. इथे थुंकता येत नाही, धुम्रपान करता येत नाही. विशेष बाब म्हणजे मल्लिनॉन्ग गावातील लोकांनी हे नियम गांभीर्याने घेतले. याचाच परिणाम म्हणजे आज मल्लिनॉन्ग हे आशियातील सर्वात स्वच्छ गाव आहे.
या नियमांचे पालन न केल्यास दंडाची तरतूदही करण्यात आली होती. गावातील प्रत्येक नागरिक स्वत: टापटिप राहण्यासोबतच घराबाहेरील रस्ता स्वच्छ करण्याची जबाबदारी घेतो. इथे जर एखाद्या व्यक्तीने साफसफाईत सहभाग घेतला नाही तर त्याला जेवण मिळत नाही.
या नदीचे नाव डौकी आहे. त्यात घाणीचा एक कणही दिसत नाही. सध्या नदीत असलेल्या बोटीकडे पाहिल्यावर असे वाटते की ती पाण्यावर नाही तर हवेत तरंगत आहे.
येथे नदीचे पाणी इतके स्वच्छ आहे की ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. नदीत अनेक फूट खाली पडलेले दगडही स्पष्ट दिसतात. जगातील सर्वात स्वच्छ नदीमध्ये तिची गणना होते.