INS Vagir Submarine Indian Navy: शत्रूची कर्दनकाळ, एका झटक्यात करते विनाश; देशसेवेसाठी सज्ज 'INS वागीर'!
सायलेंट किल्लर अशी ओळख असलेली 'आयएनएस वागीर' ही पाणबुडी आज भारतीय नौदलात दाखल होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रोजेक्ट -75 ची फ्रेंच स्कॉर्पियन डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान या पाणबुडीत आहे. यामुळे भारतीय नौदलाची (Indian Navy) ताकद आणखी वाढणार आहे.
भारतीय बनावटीची माझगाव डॉक येथे बांधण्यात आलेली 'आयएनएस वागीर' ही कलवारी वर्गाची पाचवी पाणबुडी आहे.
मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या स्वदेशी कंपनीने या पाणबुडीची निर्मिती केली आहे.
ही नौदलाच्या ताफ्यातील कलावरी श्रेणीतील पाचवी पाणबुडी आहे. भारतीय नौदलाच्या ‘प्रोजेक्ट 75’ प्रकल्पाच्या अंतर्गत आतापर्यंत कलावरी श्रेणीतील चार पाणबुड्या याआधीच नौदलात सामील झाल्या आहेत.
भारतीय नौदलाच्या (Indian Navy) ताफ्यात आज (सोमवारी) 'आयएनएस वागीर' पाणबुडी सामील होणार आहे.
संरक्षण तज्ज्ञ वागीरला 'सायलेंट किलर शार्क' असं म्हणतात. ही पाणबुडी शत्रूला चकवा देणे आणि हल्ला करण्यात सक्षम आहे. शत्रूला कल्पनाही ने येता ही पाणबुडी त्यावर हल्ला करेल.
भारतीय नौदलात सामील होणारी 'आयएनएस वागीर' पानबुडी एक आधुनिक डीझेल-इलेक्ट्रिक अटॅक सबमरीन आहे. आयएनएस वागीर समुद्रात भूसुरुंग टाकण्यास सक्षम आहे.
INS वागीर ही 350 मीटर खोलीवर तैनात केली जाऊ शकते. ही पाणबुडी स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्यामुळे शत्रू सहजासहजी याचा शोध घेऊ शकणार नाही. यामध्ये जहाजविरोधी क्षेपणास्त्रेही बसवण्यात आली आहेत.
वागीर पूर्णपणे स्वदेशी पाणबुडी आहे. ही पाणबुडी शत्रूला शोधून अचूक लक्ष्य करू शकते. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते शत्रूच्या रडारमध्ये येणार नाही.
'आयएनएस वागीर' पाणबुडीच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. यानंतर आता INS Vagir भारतीय नौदलात पाणबुडी सामील करण्यात येईल.