धीरेंद्र शास्त्रींच्या बागेश्वर धाममध्ये भक्त म्हणून हजेरी लावण्याआधी मोठी प्रोसेस! कसा मिळतो प्रवेश? प्रक्रिया पाहून चकित व्हाल...
धीरेंद्र शास्त्रींच्या या बागेश्वर धाममध्ये नेमका प्रवेश कसा मिळतो आणि त्याची प्रक्रिया काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रवचनामध्ये सामील होण्यासाठी प्रत्येकाला टोकन दिले जाते.
भक्तांना हे टोकन विशिष्ठ तारखेला बागेश्वर धामच्या पेटीत टाकावं लागतं
या टोकनसह भक्तांना एक फॉर्म भरुन द्यावा लागतो त्या फॉर्ममध्ये आपलं नाव,वडिलांचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर लिहावा लागतो
ज्या व्यक्तीचा नंबर लागतो, त्याला बागेश्वर धामकडून संपर्क केला जातो आणि उपस्थित राहण्याची तारीख दिली जाते
त्याच दिवशी बागेश्वर धाममध्ये हजेरी लावावी लागते
हजेरी लावण्याआधी भक्तांना तीनपैकी एका रंगाच्या कपड्यामध्ये नारळ बांधून टाकावा लागतो
सामान्य भक्तांनी लाल रंगाच्या कापडात नारळ बांधून टाकावा
जर विवाहप्रश्नी समस्या असतील तर पिवळ्या रंगाच्या कापडात नारळ बांधून टाकावा आणि भूतबाधा झाली असेल, तर काळ्या रंगाच्या कापडात नारळ बांधून टाकावा
उपस्थितांपैकी मोजक्या भक्तांनाच मंचावर येऊन समस्या मांडण्याची संधी मिळते बागेश्वर धामचे लोक अशा भक्तांना फोनवरुन संपर्क साधतात आणि त्यांनाच मंचावर उपस्थित राहण्याची मुभा मिळते . जोवर दर्शन होत नाही, तोवर दारु, मांस, कांदा आणि लसूण खाणे वर्ज्य असते