Veer Guardian 2023 : भारतीय हवाई दलाचा जपानमध्ये युद्धसराव, परदेशी भूमीवर दिसणार 'स्त्री शक्ती'
स्क्वॉड्रन लीडर अवनी चतुर्वेदीसह भारतीय हवाई दलाच्या तीन महिला वैमानिक देशाबाहेर होणाऱ्या एरियल वॉर गेममध्ये (Veer Guardian 2023) भारतीय सैन्य दलाचा भाग असणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appन्यूज एजन्सी एएनआयच्या रिपोर्टनुसार, वीर गार्डियन 2023 हवाई सराव 16 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान घेण्यात येणार आहे. हा सराव जपानमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
देशांमधील हवाई संरक्षण सहकार्याला चालना देण्यासाठी भारत आणि जपान संयुक्त हवाई सराव 'वीर गार्डियन-2023' आयोजित करणार आहेत.
भारतीय हवाई दलाने (IAF) निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे. संरक्षण सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल असेल.
12 ते 26 जानेवारी 2023 या कालावधीत जपानच्या हवाई सेल्फ डिफेन्स फोर्ससोबत वीर गार्डियन 2023 या पहिल्या सरावासाठी भारतीय हवाई दलाची तुकडी रविवारी जपानला रवाना होईल.
या सरावात चार Su-30 MKI, दोन C-17 ग्लोबमास्टर्स आणि एक IL-78 टँकर भारतीय हवाई दलासह सहभागी होतील.
भारतीय हवाई दलातील स्क्वाड्रन लीडर अवनी चतुर्वेदी (Avani Chaturvedi) नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे.
स्क्वॉड्रन लीडर अवनी चतुर्वेदीसह भारतीय हवाई दलाच्या तीन महिला वैमानिक देशाबाहेर होणाऱ्या एरियल वॉर गेममध्ये (Aerial Wargames) भारतीय सैन्य दलाचा भाग असणार आहेत.
भारतीय हवाई दलात पहिल्यांदाच स्क्वॉड्रन लीडर अवनी चतुर्वेदी सुखोई (Su-30MKI) लढाऊ विमान उडवणार आहे.
परदेशी भूमीवर सुखोई उडवणारी अवनी पहिली महिला वैमानिक ठरणार आहे. हा एक अद्भुत आणि अविस्मरणीय क्षण असेल.
परदेशी भूमीवर युद्धसरावासाठी तीन महिला लढाऊ वैमानिकांपैकी अवनीची यासाठी निवड झाली आहे.
अवनी चतुर्वेदी भारतीय हवाई दलातील पहिला लढाऊ वैमानिक आहे. यासह अवनीच्या नावे अनेक पराक्रम आहेत.
हा सराव जपानमध्ये आयोजित करण्यात आला आहे. ओमिटामा येथील हयाकुरा एअर बेस, त्याच्या आसपासचे हवाई क्षेत्र आणि सायमा येथील इरुमा एअर बेस येथे हा सराव केला जाईल.