Photo : राजधानी गारठली, पारा 3 अंशावर
देशाची राजधानी चांगलीच गारठली आहे. दिल्लीत तापमानाचा पारा 3 अंशाच्या आसपास गेला आहे. त्यामुळं जोराची थंडी पडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीत एकीकडं थंडी तर दुसरीकडं धुक्याची चादर पसरली आहे. तापमानाचा पारा घसरल्यामुळं आणि थंडीची चादर पसरल्यामुळं दिल्लीत जनजीवन विस्कळीत झालं आहे.
देशाच्या विविध भागात वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) तर कुठे ढगाळ वातावरण आहे.
उत्तर भारतात थंडीचा जोर अधिक आहे. देशाची राजधानी दिल्लीत थंडीचा कडाका (Delhi Cold Weather) वाढला आहे. दिल्लीत तापमानाचा पारा 3 अंशावर गेला आहे. एकीकडं थंडी तर दुसरीकडं धुक्याची चादर पसरली आहे.
दिल्लीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. थंडीमुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. पालम आणि सफदरजंग भागात दाट धुक्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
हवामान विभागानं आज दिल्लीत थंडीच्या लाटेचा 'ऑरेंज अलर्ट' आणि धुक्याचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. किमान तापमान 3 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तर कमाल तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे
धुक्यामुळे पालम आणि सफदरजंगसह अनेक भागात दृश्यमानता 50 मीटरपेक्षा कमी राहिली आहे. सध्या देशातील अनेक भागात डोंगरापासून मैदानी प्रदेशापर्यंत कडाक्याची थंडी जाणवत आहे.
दिल्ली एनसीआरमधील लोक थंडीपासून वाचण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवत आहेत.
वाढत्या थंडीचा परिणाम मानवी जीवनावर देखील होत असल्याचं दिसत आहे. दिल्लीत कडाक्याच्या थंडीमुळं रस्त्यावरील गर्दीही कमी दिसत आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे