Himachal Traffic Jam: हिमाचलमध्ये भूस्खलनामुळे वाहतूक ठप्प! 200 पर्यटक अडकले; पाहा फोटो...
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला, त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झालं आहे. रविवारी (25 जून) संध्याकाळपासून मंडी आणि कुल्लूला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग भूस्खलनामुळे ठप्प झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिमाचल प्रदेशात पाऊस आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 200 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. भूस्खलनामुळे मंडी-कुल्लू राष्ट्रीय महामार्ग 15 किलोमीटरपर्यंत जाम झाला आहे. इथे लोकांची गर्दी एवढी झाली आहे की हॉटेलमध्ये रूम मिळणंही अशक्य झालं आहे. याशिवाय हा ट्राफिक जाम किती काळ चालेल आणि सुरळीत होण्यासाठी किती वाट पाहावी लागेल, हेही लोकांना माहीत नाही.
मंडी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दुरुस्तीचे काम सुरू असून रस्त्यावरून मोठे दगड हटवण्यासाठी स्फोटकांचा वापर केला जात आहे. त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी प्रवाशांना रस्ता खुला होण्यापूर्वी मंडईकडे प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.
भूस्खलनाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मंडी निरीक्षक सकिनी कपूर यांनी सांगितलं की, येथे दरड कोसळली आहे. दरड बाजूला करण्याचं काम सुरू आहे. एकाच रस्त्याला लागून 2 भूस्खलन झाल्याने लवकरात लवकर आम्ही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही ते म्हणाले. त्याच बरोबर 7-8 तासांनंतरच महामार्ग वाहतुकीसाठी खुला होईल, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
मुसळधार पावसामुळे पांडोह-कुल्लू रस्त्यावर औटजवळील खोटीनाला येथे अचानक पूर आला. रविवारी संध्याकाळपासून पुरामुळे प्रवासी अडकून पडले आहेत.
मंडीहून चंदीगडला परतणाऱ्या एका प्रवाशाने सांगितलं की, आम्ही रविवारी संध्याकाळपासून येथे अडकलो आहोत. रस्ता बंद झाल्यामुळे ट्राफिक जाम झालं आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात दगड पडल्याने वाहनं अडकून पडली आहेत.
याशिवाय हिमाचल प्रदेशातील कांगडा, मंडी आणि सिरमौर जिल्ह्यांच्या विविध भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे.
स्थानिक हवामान विभागाने 27 ते 29 जूनपर्यंत विविध ठिकाणी मुसळधार पाऊस, वादळ आणि विजांच्या कडकडाटांचा इशारा दिला होता.