'हाऊज द जोश'... भव्य-दिव्य 'बीटिंग द रिट्रीट' सोहळा; फोटो पाहुन म्हणाल, 'मला भारतीय असल्याचा अभिमान'
Beating The Retreat Ceremony 2023: यंदाचा 'बीटिंग द रिट्रीट' सोहळा शास्त्रीय संगीताच्या सुमधूर सुरांनी संपन्न झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनानिमित्त 29 जानेवारीच्या संध्याकाळी 'बीटिंग द रिट्रीट सोहळा' संपन्न झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ताफा दिल्लीतील विजय चौकात पोहोचल्यानंतर सोहळ्याला सुरुवात झाली. (फोटो : ANI)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी या सोहळ्याला हजेरी लावली. (फोटो : ANI)
'बीटिंग द रिट्रीट सोहळा' म्हणजे, प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा समारोप. या सोहळ्यात लष्कर, हवाई दल, नौदलाच्या बँडच्या पारंपारिक सुरांसह झालेलं सादरिकरण प्रेक्षणीय होतं. (फोटो : ANI)
'बीटिंग द रिट्रीट' सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही दिल्लीच्या विजय चौकात पोहोचले होते. रिमझिम पावसानंही या सोहळ्याला हजेरी लावली होती. (फोटो : DD न्यूज)
खरं तर हा सोहळा भारतात 1950 पासून सुरू झाला. 'बीटिंग द रिट्रीट' सोहळ्याला भारतीय सैन्याचे तीन दल आणि राज्य पोलिसांच्या CAPF म्युझिक बँडनं 29 सुरांनी चार चाँद लावले. (फोटो : DD न्यूज)
यावर्षी 'बीटिंग द रिट्रीट' समारंभातील ड्रोन शो उत्कृष्ट होता, त्यात 3,500 स्वदेशी ड्रोनचा समावेश होता, ज्यामुळे हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा ड्रोन शो ठरला. 'अल्मोडा', 'केदारनाथ', 'संगम द्वार', 'सातपुडा की राणी', 'भागीरथी', 'कोकण सुंदरी' या तिन्ही सेनानींनी वाजवलेल्या लक्षवेधक सुरांनी लोकांना मंत्रमुग्ध केलं. (फोटो : DD न्यूज)
यावेळी बीटिंग रिट्रीटमध्ये प्रथमच नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकसमोरील थ्रीडी अॅनामॉर्फिक प्रोजेक्शन आकर्षणाचे केंद्र ठरलं. (फोटो : DD न्यूज)