Independence Day : 'आझादी का अमृत महोत्सव'; कुठे बाईक तर कुठे सायकल रॅली, देशभरात स्वातंत्र्य दिनानिमित्त जंगी तयारी
भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाआधीच संपूर्ण देश तीन रंगात न्हाऊन निघाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशभरात ठिकठिकाणी तिरंगा रॅलीसह इतर देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
मुंबई पोलिसांच्या वतीनं आज 'आझादी की दौड' मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अभिनेता अक्षय कुमार यांची उपस्थिती होती.
देवेंद्र फडणवीस आणि अक्षय कुमारने या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मुंबई पोलिसांची बाईक रॅली पाहायला मिळाली.
दुचाकीस्वार पोलीस यावेळी तिंरगा घेऊ होते. यावेळी वाहतुकीच्या सर्व नियमांचं पालन करण्यात आलं. त्यानंतर या मॅरेथॉनला सुरुवात झाली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने 75 किलोमीटर तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी सात वाजता ह्या सायकल रॅलीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हिरवा झेंडा दाखवला.
हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजन केलेल्या या तिरंगा सायकल रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सायकल स्वरांनी सहभाग नोंदवला.
सर्व सायकल स्वारांनी सायकलला तिरंगा झेंडा लावून रॅलीत सहभाग नोंदवला आहे.
अहमदनगरच्या पाथर्डीत काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत भाजप आमदार मोनिका राजळे यांनी ढोल वाजविण्याचा आनंद लुटला.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 13 ऑगस्टपासूनच देशात हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात झाली आहे.
13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.