Har Ghar Tiranga : राज्यभरात 'हर घर तिरंगा' अभियानाला चांगला प्रतिसाद, घरोघरी फडकला तिरंगा
भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण (Independence Day) होत आहेत. यानिमित्त देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आजपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरात आज भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. 320 फूट लांब आणि नऊ फूट रुंद आकाराचा तिरंगा हे या पदयात्रेचं मुख्य आकर्षण होतं. राष्ट्रीय सेवा योजनेचे 700 हून अधिक स्वयंसेवक या तिरंगा पदयात्रेत सहभागी झाले होते. लेझिम पथकासंह सुरु होणारी ही पदयात्रा क्रीडा संकूल ते महात्मा जोतिबा फुले परीक्षा भवन ते फिरोजशहा मेहता भवन ते गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्था ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन असा प्रवास करत पुन्हा क्रीडा संकूल येथे या भव्य पदयात्रेचा समारोप झाला.
परळीत 150 फूट उंच तिरंगा ध्वजाचं लोकार्पण आज करण्यात आलं. परळी नगर परिषदेच्या माध्यमातून वैद्यनाथ कॉलेजच्या पाठीमागील डोंगरावर हा ध्वज आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने या स्फूर्तीस्थळाचे लोकार्पण माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
जालना जिल्ह्यातील मंठा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 501 फुटी विक्रमी तिरंगा रॅली काढण्यात आली ,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शहरातील स्वामी महाविद्यालयात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा रॅली काढण्यात आली.
image 5
image 6
image 7
image 8
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'हर घर तिरंगा' अभियानाच्या जनजागृतीसाठी धुळ्यातील जमीयत उलेमा हिंद यांच्यावतीने शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. आमदार फारुक शाह यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मुस्लिम समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या रॅलीमुळे शहर तिरंगामय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहराच्या विविध भागातून निघालेल्या या तिरंगा रॅलीचा देवपूर बस स्थानक येथे समारोप करण्यात आला. यावेळी मुस्लिम धर्मीय बांधवांनी दिलेल्या देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त शासनाच्या 'हर घर तिरंगा' या उपक्रमाअंतर्गत मालेगाव शहरामध्ये आज भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. मालेगाव शहरांच्या लहूजी नगरमधून ही भव्य दिव्य रॅली काढण्यात आली. शहरातील विविध चौकातून मार्गक्रमण करत अनेक जातीधर्माच्या महिला पुरुषांनी एकत्र येत मोटर सायकल रॅली काढली.
या रॅलीत प्रत्येक जाती-धर्माच्या नागरिक आपआपल्या मोटरसायकलसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
देशभरात 75 व्या स्वातंत्र्यदिनाची (Independence Day) तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. यंदा 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' (Azadi ka Amrit Mahotsav) मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारकडून 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी आजपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.