Independence Day 2023: देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह; ठिकठिकाणी रॅली आणि कार्यक्रमांचं आयोजन, पाहा फोटो
श्रीनगरमध्ये CRPF जवानांनी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने बाईक रॅली काढली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रीनगरमधील CRPF जवानांच्या बाईक रॅलीतील हा फोटो लक्ष वेधून घेणारा आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये अखंड संकल्प तिरंगा यात्रा काढण्यात आली होती. यात सहभागी होताना तिरंगा घेऊन लोकांनी नर्मदा नदी ओलांडली आहे.
उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला 'हर घर तिरंगा' मोहिम साजरी करण्यात आली. शाळकरी मुलांनी या मोहिमेअंतर्गत तिरंगा हाती घेऊन रॅली काढली होती.
जम्मूमध्ये काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत देखील अनेक विद्यार्थांनी सहभाग नोंदवला.
स्वातंत्र्य दिनापूर्वी श्रीनगरमधील दाल सरोवराच्या काठावर स्थानिक लोक 'तिरंगा' रॅलीत सहभागी झाले होते.
अहमदाबादमध्ये अमित शाहांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली होती, यालाही जनतेने मोठा प्रतिसाद दर्शवला.
रांचीमध्ये काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीतही अनेक जणांनी सहभाग घेतला.
दिल्लीजवळील नोएडामध्ये देखील स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला तिरंगा रॅली काढण्यात आली होती.
उत्तर प्रदेशच्या मेरठमधील शालेय विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.
नवी दिल्लीतही सोमवारी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
या रॅलीतील हा सुंदर फोटो मन आकर्षून घेतो.
तिरंगा रॅलीत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा हा फोटो देखील आकर्षक आहे.
देशाप्रतिचं प्रेम दर्शवण्यासाठी विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढली होती.
स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला देशभरातील जवानांनी पायी रॅली देखील काढली होती.
अनेक पक्षांनी देखील त्यांच्या तिरंगा रॅली आयोजित केल्या होत्या.
उत्तर प्रदेशात स्वातंत्र्य दिनाचा अनोखा उत्साह पाहायला मिळाला.
देशभरातील असंख्य जनतेने तिरंगा रॅलीला उदंड प्रतिसाद दिला.