2014 ते 2022...लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींनी केलेल्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घोषणा
2014 पासून प्रत्येकवेळी लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी हे काही ना काही महत्त्वाच्या घोषणा करत आले आहेत. यावेळी तर 2024 च्या निवडणुकीआधीचं त्यांचं शेवटचं भाषण असणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने ते कुठली महत्त्वाची घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. जाणून घेऊया लाल किल्ल्यावरुन मोदींनी केलेल्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घोषणा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2014 - लाल किल्ल्यावरच्या या पहिल्या भाषणात मोदींनी स्वत:चा उल्लेख प्रधान सेवक केला. स्वच्छ भारत योजनेची घोषणा याच भाषणात झाली, मेक इन इंडियाचाही उल्लेख
2015 - जनधन योजनेची घोषणा या भाषणात, स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया
2016 - या वर्षी कुठली महत्वाची योजना तर जाहीर नाही झाली, पण मोदींनी भाषणात बलुचिस्तानचा उल्लेख केला, पाकिस्तानच्या दडपशाहीचा जाहीर निषेध केला
2017 - प्रत्येक गरिबाला पक्कं घर मिळवून देण्यासाठीची घोषणा
2018 - आयुष्मान भारत योजनेची घोषणा लाल किल्ल्यावरुन झाली
2019 - चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची घोषणा या भाषणात
2020 - व्होकल फॉर लोकल हा मंत्र मोदींनी या भाषणात दिला
2021 - गतिशक्ती योजनेची घोषणा, देशाच्या कानाकोपऱ्याला जोडणाऱ्या वंदे भारत ट्रेनचीही घोषणा
2022 - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातलं हे भाषण, 2047 पर्यंत भारताला सशक्त करण्यासाठी विकासाचे पंचप्राण काय यावर मोदींनी भाष्य केलं.