Independence Day 2022: राजधानी दिल्ली स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी सज्ज, पाहा फोटो
सोमवारी देशात स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेश सोमवारी 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. हा स्वातंत्र्यदिन अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे.
सोमवारी देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत असून संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे. अशा परिस्थितीत राजधानी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या भाषणासाठी सुरक्षा दलांनी तयारी सुरु केली आहे.
लाल किल्ल्याभोवती 10,000 हून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत. येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत.
लाल किल्ल्यावर बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
ऐतिहासिक किल्ल्याच्या संरक्षणासाठी सुरक्षा दल कोणतीही कमतरता सोडण्यात आलेली नाही. येथे सुमारे सात हजार लोक कार्यक्रमासाठी जमतील.
सुरक्षा दलांनी लाल किल्ल्याचे रूपांतर अभेद्य किल्ल्यामध्ये केले आहे.
यादरम्यान, एसपीजी जवान येथे स्वातंत्र्य दिनापूर्वी सुरक्षा तालीम करताना दिसले.
या सुरक्षेच्या तालीम दरम्यान, एसपीजी जवानांनी आपत्कालीन परिस्थितीत व्हीआयपीनांना बाहेर काढण्यासाठीही तयारी केली आहे.