Weather Update: जुलै महिन्यातही मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा 25 राज्यांना अलर्ट जारी
जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच हवामान विभागाने सावधगिरीचा इशारा दिला आहे. यामुळे लोकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, जुलै महिन्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे लोकांना अनेक अडचणींना समोरे जावं लागू शकतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतंच India Meteorological Department (IMD) विभागानं 25 राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामध्ये काही राज्यात जोरदार मुसळधार पावलाची शक्यता आहे. तर काही राज्यात मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे जुलै महिन्यात देशातील बहुतेक राज्यांत जोरदार पाऊस पडणार आहे.
ज्या 25 राज्यांत पावसाच्या सतर्कतेचा इशारा दिला आहे त्यामध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अंदमान-निकोबार, तमिळनाडू, केरळ, झारखंड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक आणि तेलगणा या राज्यांचा समावेश आहे.
नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुराम या राज्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, कोकण आणि गोवा या राज्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जून महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे लोकांना थोडासा मोठा दिलासा मिळाला आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणीच पाणी साचलं आहे. यामुळे लोकांच्या घरात पाणी भरलं. यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.