Indian Railway: कसं कराल रेल्वेच्या संपूर्ण बोगीचे बुकिंग? जाणून घ्या सविस्तर
लग्नासाठी किंवा कोणत्याही सहलीसाठी मोठ्या कुटुंबाला सोबत नेण्यास जरा कठीण होते. सोबतच मोठ्या कुटुंबाच्या खर्चाचीही चिंता असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडेस्टिनेशन वेडिंग किंवा प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी तुम्ही ट्रेनमध्ये संपूर्ण डबा आरक्षित करू शकता.
यासाठी IRCTC किंवा FTR तुम्हांला ही सेवा देते ज्याद्वारे तुम्ही संपूर्ण कोच किंवा ट्रेन आरक्षित करू शकता.
यासाठीhttps://www.ftr.irctc.co.in/ftr/च्या अधिकृत वेबसाईटवर जा. इथे तुम्हांला सर्वात आधी युजर आयडी आणि पासवर्ड बनवावा लागेल.
तुम्ही हे बुकिंग प्रवासाच्या ३० दिवस ते ६ महिने आधी करू शकता. तुमची सहल रद्द झाल्यास, तुम्ही बुकिंग देखील रद्द करू शकता.
यानंतर तुमच्या समोर पेमेंट पेज उघडेल जिथे तुम्ही पेमेंट करू शकता. यानंतर तुमचा कोच किंवा ट्रेन बुक केली जाईल
संपूर्ण ट्रेन किंवा कोणताही एक डबा बुक करण्यापूर्वी, त्याच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण नियमांबद्दल देखील जाणून घ्या.
तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी किंवा गटासाठी AC प्रथम श्रेणी, AC 2-Tier, AC 3-Tier, AC 2 cum 3 Tier, AC चेअर कार, स्लीपर अशी कोणताही बोगी बुक करू शकता.
फक्त एक कोच बुक करण्यासाठी तुम्हाला 50,000 रुपये मोजावे लागतील. त्याच वेळी, संपूर्ण ट्रेन बुक करण्यासाठी तुम्हाला 9 लाख रुपये द्यावे लागतील.