Weather : कुठं कडक उन्हाचा तर कुठं मुसळधार पावसाचा अंदाज

देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठे उन्हाचा चटका जाणावत आहे, तर कुठे अवकाळी पाऊस पडत आहे.

imd Weathe update

1/10
देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठे उन्हाचा चटका जाणावत आहे, तर कुठे अवकाळी पाऊस पडत आहे.
2/10
काही भागात पडलेल्या पावसामुळं उष्णतेपासून दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा देशात तापमानाचा (Temperature) पारा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
3/10
सध्या देशाच्या राजधानीसह अनेक भागात तापमान हे 40 अंशाच्या पुढे गेलं आहे.
4/10
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत देशातील अनेक भागात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे.
5/10
बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.
6/10
काही भागात तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर काही भागात मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.
7/10
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण आठवडाभर देशातील अनेक राज्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
8/10
13 मे रोजी देशाच्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. मात्र त्यामुळं तापमानात घट होणार नाही.
9/10
तापमानत वाढ होणार असल्यानं नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
10/10
बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर मोठा परिणाम होत आहे. हाती आलेली पिकं वाया जात आहेत.
Sponsored Links by Taboola