Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Railway Knowledge : तु्म्हाला माहिती आहे का भारतीय रेल्वेचे नाव कसे ठरवले जाते ? याबद्दल जाणून घ्या !
Railway Knowledge : भारतीय रेल्वेने दररोज लाखो-कोटी लोक प्रवास करतात. जगातील सर्वाधिक मोठे रेल्वेचे जाळे म्हणून भारतीय रेल्वेची ओळख आहे. भारतीय रेल्वेचा जगात चौथा क्रमांक आणि आशिया खंडात दुसऱ्या क्रमांक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय रेल्वेकडे हजारो मालगाड्या आहेत. या मालगाड्यांमुळे देशातील इतर राज्यात माल वाहून नेण्यासाठी मदत होते. यासाठी लाखो कमर्चारी काम करत असतात. भारतीय रेल्वेच्या सेवेत जवळपास 10 लाख कर्मचारी कार्यरत आहेत.
दररोज कोट्यावधी लोक भारतीय रेल्वेने प्रवास करत असतात. यासाठी जवळपास 13 हजार रेल्वे गाड्या सेवा देत असतात. यासाठी हजारो हजारो रेल्वे स्टेशन्सची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेची 7 हजारपेक्षा जास्त रेल्वे स्टेशन्स आहेत.
भारतीय रेल्वे इतका मोठा कारभार सांभाळण्यासाठी रेल्वेच्या सुविधा वाढवण्यावर आणि आधुनिकीकरणावर जास्त भर देत आहे.
तुम्ही अनेक रेल्वेची नाव ऐकली असतील, तुम्हाला काही नाव तोंडपाठही असतील.पण आज आपण भारतीय रेल्वेची नाव कशी ठरवली जातात. यामागचा फार्मुला जाणून घेणार आहोत.
कोणत्याही रेल्वेचे नाव ठरवताना आधी त्या त्या देशातील राज्य आणि शहराचा विचार केला जातो. जसे की, दोन राज्यांना जोडणारी रेल्वे राजधानी एक्सप्रेसच्या नावाने ओळखली जाते.
तुम्ही शताब्दी, दुरंतो आणि चेन्नई एक्सप्रेसने प्रवास केला असेल, तर तुम्हाला माहिती असेल की या रेल्वे सर्वाधिक चांगल्या दर्जाच्या सुविधा देतात. या रेल्वेचा प्रति तास वेगही खूप जास्त असतो.
शताब्दी एक्सप्रेस देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांच्या 100 व्या जन्मदिवसानिमित्त 1989 साली रेल्वे सुरू करण्यात आली आहे. यामुळे शताब्दी एक्सप्रेस असं नाव ठेवण्यात आले आहे.
दुरंतो एक्सप्रेस म्हणजे अखंडपणे धावणारी रेल्वे. ही रेल्वे खूप कमी स्टेशन्सवर थांबते. त्यामुळे या रेल्वेला दुरंतो एक्सप्रेस असं म्हटले जाते.
रेल्वेची नाव ठरवताना भारतीय रेल्वेने एक फॉर्मुला वापरला आहे. जिथून रेल्वे सुरू होते आणि जिथं प्रवास संपतो त्या शहराचे नाव दिले जाते. जसे की, चेन्नई-जयपुर एक्सप्रेस, कोटा-पटना इत्यादी.
याशिवाय तेथील परिसराची धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख लक्षात घेतली जाते आणि रेल्वेची नाव ठरवली जातात. जसे की, गोल्डन टेम्पल एक्सप्रेस, काशी-विश्वनाथ एक्सप्रेस आणि वैशाली एक्सप्रेस इत्यादी.