Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hot Summer : गल्ली ते दिल्ली सूर्य तळपला...
देशभरात गेल्या काही दिवसापासून उष्णतेत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत असून, अनेक ठिकाणी उष्णतेचा पारा 43 अंशाच्यावर गेलेला पाहायला मिळाला. (Photo:PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीत उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. आग्र्याच्या ताजमहालला भेट देताना उन्हापासून बचाव करण्यासाठी पर्यटक छत्री वापरताना दिसतात. (Photo:PTI)
तीव्र उन्हाच्या झळांमुळे दिल्ली दर्शनाला येणाऱ्या पर्यटकांची संख्याही कमी झाली आहे. (Photo:PTI)
उन्हाचा कहर प्रचंड वाढत असल्याने डोके आणि चेहऱ्याला वाचवण्यासाठी स्कार्फ अथवा रुमालचा वापर केला जातोय. तरुणीही घरातून बाहेर पडण्यापूर्वी स्कार्फने स्वत:चा चेहरा झाकत आहेत.
उन्हाच्या झळा वाढल्यामुळे कुलरची मागणीही वाढली आहे. (Photo:PTI)
दुपारच्या उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी अश्या प्रकारे लोकांना मिळेल तो सहारा घ्यावा लागत असल्याचे जागोजाग पाहायला मिळते (Photo:PTI)
राज्यासह पुण्यात मागील काही दिवस अवकाळी पावसानं थैमान घातलं होतं. यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं. मात्र यानंतर आता राज्यात सूर्य आग ओकणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे.
राज्यातील मराठवाडा विदर्भ याभागात देखील उष्णतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे पुढील दोन ते तीन दिवस पुणे शहरासह राज्यात तापमानात मोठी वाढ होणार असल्याचं पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आल आहे. (Photo:PTI)