Cyclone Michaung : चक्रीवादळाचा कहर! चेन्नईमध्ये रनवे पाण्याखाली, अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस
चेन्नई, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. (Image Source : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदक्षिण भारतातील राज्यांमध्ये सध्या मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरु आहे. पावसाचा तडाखा 5 डिसेंबरपर्यंत कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Image Source : PTI)
मिचॉन्ग चक्रीवादळ (Cyclone Michaung Update ) सध्या दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावर आहे आणि ते उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. (Image Source : PTI)
येत्या 24 तासांत चक्रीवादळ आणखी तीव्र होऊन दक्षिण आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडू किनारपट्टीतून सोमवारी सकाळी पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे. (Image Source : PTI)
बंगालच्या उपसागरात तयार झालेले मिचॉन्ग चक्रीवादळ अधिक धोकादायक बनलं आहे. दक्षिण भारतात या चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसताना दिसत आहे. (Image Source : PTI)
मच्छिमारांनाही हवामान विभागाकडून सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मच्छिमारांनी बोटी बंदरात उभ्या केल्या आहेत. (Image Source : PTI)
मुसळधार पावसामुळे चेन्नईमध्ये अनेक भागात पाणी साचलं आहे. चेन्नईमध्ये जोरदार पाऊस सुरु असून रनवेही पाण्याखाली गेला आहे. यामुळे विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
मिचॉन्ग चक्रीवादळ येत्या 24 तासांत आंध्र प्रदेश आणि ओडिशा दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. (Image Source : PTI)
मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यानच्या किनारपट्टीवर ताशी 100 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. (Image Source : PTI)
हवामान खात्याने आंध्र, तामिळनाडू, केरळ आणि ओडिशासाठी इशारा दिला आहे. समुद्र किनारी भागात प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. मिचॉन्ग चक्रीवादळामुळे समुद्रकिनारी भागातून जाणाऱ्या 144 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. (Image Source : PTI)