Revanth Reddy : तेलंगणात जिकडे तिकडे रेवंत रेड्डींचा जयघोष, काँग्रेसचा धुरळा!
तेलंगणामध्ये काँग्रेसने बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असून काँग्रेस सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीआरएसचा पराभव करत काँग्रेस तेलंगणामध्ये दहा वर्षांनंतर सत्ता स्थापन करणार आहे. त्यानंतर आता कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला आहे.
तेलंगणामध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशामध्ये रेवंत रेड्डी यांचा मोठा हात असून ते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असतील.
रेवंत रेड्डी हे तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष आहेत. आक्रमक कार्यशैली आणि संघटनेत दबदबा असं रेवंत रेड्डी यांचं नेतृत्व आहे.
रेवंत रेड्डी हे तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांची काम करण्याची शैली अनेकांना भावून गेली. प्रचंड जनसंपर्क आणि शब्दाला जागणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे.
त्यामुळे रेवंत रेड्डी यांना जनतेचा पाठिंबा मिळाला. काँग्रेसने त्यांच्याच चेहऱ्यावर निवडणूक लढवली आहे.
रेवंत रेड्डी यांनी 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्याबद्दल तरुणाईमध्ये असणारी क्रेज, ग्राऊंडवरचं काम असल्यामुळे रेवंत रेड्डी यांनी लोकसभा निवडणूक जिंकली.
रेवंत रेड्डी हे सुरुवातील भाजपच्या नेतृत्त्वातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यरत होते. त्यानंतर ते चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पार्टीत दाखल झाले.
टीडीपीमधून त्यांनी दोन वेळा विधानसभा लढवून विजयी झाले. त्यानंतर पक्षांतर्गत वादामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये काँग्रेसमध्ये दाखल झाले.