Gold Rate : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, दिवाळीत सोने 80 हजारांवर जाण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदसऱ्याच्या दिवशीच मुंबईत सोन्याचा दर 77 हजार 800 हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला आहे.
दिवाळीपर्यंत सोन्याचा दर हा 80 हजार प्रति तोळ्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता सोने व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
भारतात दसरा आणि नंतर दिवाळीच्या सणाचा काळ असल्याने सोन्याला मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे सोन्याचे भाव पुन्हा वधारल्याचे चित्र आहे.
सोन्यासोबतच चांदीच्या दरातह सातत्याने वाढ होत असून दसऱ्याच्या दिवशी चांदी एक हजार रूपयांनी वाढली आहे.
दसऱ्याच्या दिवशी चांदीचा भाव 97 हजार रूपये प्रति किलो आहे.
आगामी काळात, दिवाळीपर्यंत सोन्याचा दर थेट 80 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.