Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gold price : सोन्याचा दर 70 हजारांच्या पार, एका दिवसात सोन्याच्या भावात दोन हजारांची वाढ
मार्च महिन्यात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. मागील आठवड्यात सोन्याचे दर 2500 रुपयांनी वाढले आहेत [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदा मार्च महिन्यातच सोन्याचे भाव 70,000 च्या पुढे गेले आहेत. हा दर 75,000 पर्यंत जाण्याचा अंदाज आहे .[Photo Credit : Pexel.com]
आज 1 एप्रिल रोजी सोन्याने 70,000 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. 70,108 रुपये एवढा दर सोन्याचा आहे . [Photo Credit : Pexel.com]
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर महागलेत तर फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करणार अशी चर्चा सध्या आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. [Photo Credit : Pexel.com]
मागील आठवड्यात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ पाहायला मिळाली आहे.जीएसटीसह मागील आठवड्यातील दर पाहुयात . 26 मार्च रोजी सोन्याचे दर 68,412 रुपये एवढा होता त्यानंतर त्यात वाढ होत आहे . [Photo Credit : Pexel.com]
27 मार्च रोजी सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 68,577 रुपये एवढी झाली. तर 69102 रुपये एवढा दर 28 मार्च रोजी सोन्याला बाजारात मिळाला . [Photo Credit : Pexel.com][Photo Credit : Pexel.com]
29, 30 आणि 31 मार्च रोजी सोन्याचे दर स्थिर राहिले. 69,658 रुपये एवढा दर मार्चच्या शेवटी सोने खरेदीसाठी ग्राहकांना मोजावा लागला. [Photo Credit : Pexel.com]
ऐन लग्नसराईत वाढलेले हे सोन्याचे भाव सोने खरेदी करणाऱ्या प्रत्येकासाठी काळजीचा विषय बनला आहे . [Photo Credit : Pexel.com]